अहिल्यानगर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. जास्तीत जास्त सभा घेऊन मैदान मारण्यासाठी उमेदवारांचा प्रयत्न चालू आहे. या निवडणुकीत अहिल्यानगर या जिल्ह्याची सगळीकडे चर्चा चालू आहे. कारण या जिल्ह्यात थोरात आणि विखे या दोन्ही बड्या घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेर या मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तर शिर्डी या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) हे निवडणूक लढवत आहेत. विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांनी तिकीट मिळवण्यासाठी बराच खटाटोप केला, मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. यावरच सुजय विखे यांनी एका जाहीर सभेत भाष्य केलंय. काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, असं विखे म्हणालेत.

...नंतर अचानक काय झालं माहिती नाही.

सुजय विखे शिराळ चिंचोडी येथे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारार्थ एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावं, असं आवाहन केलं. यावेळी बोलताना त्यांनी स्वत:विषयी सांगताना मिश्किल भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, असं सुजय विखे पाटील म्हणाले. "लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगलं वातावरण असताना नंतर अचानक काय झालं माहिती नाही. माझा पराभव झाला," असं सुजय विखे म्हणाले.

वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली

तसेच, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली, असं सांगत सुजय विखेंनी संगमनेर येथील सभेदरम्यान झालेल्या सभेची आणि गोंधळाची आठवण काढत चांगलीच टोलेबाजी केली. विखे यांच्या हा विधानानंतर सभेत चांगलाच हशा पिकला.

त्या सभेमुळे संगमनेरमधील संधी हुकली

दरम्यान, सुजय विखे यांनी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आमदार होण्यासाठी ते प्रयत्नरत होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे एका विराट सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेत वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. देशमुख यांच्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गजहब उडाला होता. त्यानंतरची स्थिती लक्षात घेता विखे यांना संगमनेरमधून तिकीट मिळालं नाही. असं असलं तरी शिराळ चिंचोडीच्या सभेत झालं ते झालं आपण काय थकलेलो नाहीत. आपण पुन्हा जोमाने काम करू, असं म्हणत सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यात विखे यांना भाजपाकडून पुन्हा संधी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Sujay Vikhe Video News :

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/kDAp5Mw Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल

<a href="https://ift.tt/Ddoqa21 Vikhe : संगमनेर विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, प्रस्थापितांना मॅनेज...

संगमनेरमधील हिंसक प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दखल, उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता अजित पवारांकडूनही सुजय विखेंची कानउघडणी

from ABP Majha Headlines : 7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/Ns81n0L
Video : शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, लोकसभेतला पराभव, विधानसभेची संधी हुकल्यानंतर सुजय विखेंनी मन केलं मोकळं!
November 08, 2024
0