Ads Area

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर 2024 : ABP Majha

<p>&nbsp;Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान &nbsp;सुपरफास्ट आढावा : 6 AM :14नोव्हेंबर &nbsp;2024 : ABP Majha</p> <p>राज्यातील लक्षवेधी लढती आणि जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातील निवडणुकांकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी पारंपरिक लढती होत असून परळी आणि माजलगाव मतदारसंघाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षण आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा शब्दा जिल्ह्यात प्रमाण मानला जात आहे, त्यामुळे येथील मतदारसंघात कोणता उमेदवार निवडून येणार, कोणता उमेदवार पडणारे याची चर्चा जिल्ह्यात आहे. कारण, परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे मैदानात आहेत. तर, माजलगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash solanke) हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये त्यांनी आरक्षण चळवळीच्या लढ्यावेळी आपलं घर जाळण्यात आल्याची आठवण सांगितली. तसेच, मी कोणाच्याही नावाने तक्रार केली नाही, असेही ते म्हणाले. &nbsp; मी असं काय पाप केलं होतं.. माझं आणि माझ्या भावाचे घर जाळण्यात आले. आंदोलन करण्याची ही पद्धत होती काय? घर सोडून आम्हाला पळून जावं लागलं. दोन दोन अडीच वर्षाच्या नातवांना अक्षरशः बंगल्यावरून खाली झेलावं लागले. आंदोलन करण्याची ही कसली रीत आणि संस्कृती आहे, असा सवाल प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला आहे. तसेच, मी कोण्याही आंदोलनकर्त्यांच्या नावाची तक्रार दिली नाही. मी कोणालाही अटक करण्यास लावले नाही. इतर कार्यालये जाळण्यात आली त्याच अनुषंगाने पोलिसांनी कारवाई केली होती. तक्रार केली म्हणून मला बदनाम करण्यात आले. जर, मी तक्रार केली असेल तर मला भर चौकात फाशी द्या, असे भावनिक वक्तव्य महायुतीचे माजलगाव मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांनी केले आहे. त्यामुळे, येथील निवडणुकीत पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी असल्याचे पाहायला मिळत आहे.&nbsp;</p>

from Zero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं? https://ift.tt/v67cViY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area