Ads Area

Mohan Bhagwat Vote :मोहन भागवतांनी नागपुरात केलं मतदान

<p>Mohan Bhagwat Vote :मोहन भागवतांनी नागपुरात केलं मतदान&nbsp;</p> <p>राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान होत असून महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षांच्या एकूण 4136 उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होणार असून ते संध्याकाळी 6 वाजता बंद होणार आहे. मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्रं ग्राह्य धरले जातील असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शनिवारी, 23 नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.&nbsp;</p> <p>गेल्या महिनाभरापासून राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला असून सत्तेच्या चाव्या आपल्याकडेच राहाव्यात यासाठी महायुती प्रयत्नशील आहे. तर लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने सत्ता परत मिळवण्यासाठी कंबर कसल्याचं दिसून येते. काही तुरळक अपवाद वगळता राज्यात कोणतीही अनुचित घटना झाली नाही. आज मतदानाचा दिवस आहे.</p> <p>आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील 9.7 कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. त्यापैकी मुंबईत एकूण 2538 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.&nbsp;</p>

from Ajit Pawar Baramati : योग्य उमेदवाराला नागरिकांनी मतदान करावं - अजित पवार https://ift.tt/3LHbQvc

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area