Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024) महायुतीनं (Mahayuti) दणदणीत विजय मिळवला. तर, दुसरीकडे उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) पोटनिवडणुकीतही भाजपनं (BJP) घवघवीत यश मिळवलं. या निवडणूक निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेसला (Congress) भारताच्या राज्यातील 'परजीवी पक्ष' म्हणून संबोधलं आहे. एवढंच नाहीतर काँग्रेस केवळ स्वतःच्या पराभवाला कारणीभूत नाही, तर मित्रपक्षांनाही खाली खेचत असल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काल जाहीर झाला, त्यामध्ये महायुतीनं धमाकेदार कामगिरी केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. यावेली बोलताना मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खराब कामगिरीचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पक्षानं निवडणुकीत वीर सावरकरांचा मुद्दा तात्पुरता सोडला, पण जनतेचा विश्वास जिंकता आला नाही. काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीनं राज्यातील प्रत्येक पाचपैकी चार जागा गमावल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट 20 टक्क्यांपेक्षा कमी होता.

"भेदाभेदाचं राजकारण आणि वक्फ बोर्ड यांच्यातील विवाद"

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर भेदाभेदाचं राजकारण केल्याचे आणि व्होट बँकांसाठी संविधानासोबत खेळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसनं 2014 मध्ये सत्ता सोडल्यानंतर काँग्रेसनं दिल्ली आणि आसपासच्या अनेक मालमत्ता वक्फ बोर्डाच्या ताब्यात दिल्या. काँग्रेसनं असं करणं म्हणजे, बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान निर्मात्यांचा विश्वासघात असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काँग्रेसनं देशाच्या धर्मनिरपेक्ष परंपरेचं नुकसान केलं आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

"जातीचं विष आणि काँग्रेसची सत्तेची भूक"

पंतप्रधानांनी काँग्रेसवर सामाजिक न्यायाच्या भावनेला नुकसान पोहोचवल्याचा आरोप लावला. ते म्हणाले की, पक्ष जातियवादाला विरोध करण्याऐवजी जातियवादाचं विष चौफेर पसरवत आहे. त्यानं म्हटलं की, काँग्रेसचं 'शाही कुटुंब'आपल्या सत्तेची भूक भागवण्यासाठी देश आणि समाजाच्या हिताकडे दुर्लक्ष करतं. हा पक्ष फक्त आपल्या विचारांपासून भरकटला नाही तर, आपले जुने समर्थक आणि कार्यकर्त्यांनाही निराश करतेय, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/ji7TPQH Election Result: मुख्यमंत्री शिंदेंना आमदार फुटण्याची भिती? विधानसभेतील घवघवीत यशानंतही पक्षानं घेतला 'हा' मोठा निर्णय

from ABP Majha Headlines : 7 AM : 24 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/5r8M6gv
Maharashtra Assembly Election Results 2024: "काँग्रेस आपल्या मित्रपक्षांनाही बुडवतं..."; महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या पराभवावर पंतप्रधान मोदींची टीका
November 23, 2024
0
Tags