Ads Area

Akbaruddin Owaisi: भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढीवाल्यांचाही: अकबरुद्दीन ओवेसी

छत्रपती संभाजीनगर: भारत हा देश हा जितका टिळा लावणाऱ्यांचा आहे, तितकाच दाढी असणाऱ्या लोकांचाही आहे, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी केले. भाजप आणि शिवसेना हे हिंदुत्ववादी पक्ष आहेत. भाजपची विचारधारा असणाऱ्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले.  उद्धव ठाकरे हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदुत्त्व शिकवण्यात यशस्वी झाले का? राहुल गांधी हे उद्धव ठाकरे यांना सेक्युलर शिकवण्यात यशस्वी झाले का? अजित पवारांनी आपल्या भ्रष्टाचाराचा अभ्यास मोदी आणि योगी यांना शिकवलं का? यांना फक्त सत्ता आणि सत्तेची गादी पाहिजे, असे अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. ते मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत बोलत होते.

अकबरुद्दीन ओवेसी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील प्रचारसभेत ते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा होत्या. यावेळी अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मी मुस्लिम असून मला गर्व आहे मुस्लिम असल्याचा, आणि मला अभिमान आहे मी हिंदुस्थानी आहे. मी मुस्लिम असलो तरीही आम्ही ब्राम्हण समाजाला देखील पुढे आणू. मी चिथावणीखोर भाषण करतो, असे सांगितले जाते. पण आमच्या प्रश्नांची उत्तरे यांच्याकडे नसतात, मग माझ्या भाषणांना चिथावणीखोर ठरवले जाते. योगी म्हणतात बटेंगे के तो कटेंगे. बीफ, घरवापसी नावावर तुम्ही जे कापत आहे, त्यामुळे देश कमजोर होत नाही का? हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद लावून तुम्ही देशाला कमजोर करत नाही का ?, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

हा देश सर्व धर्मातील लोकांचा आहे. हा देश मोदी आणि योगींचा आहे, तितकाच माझाही आहे. मात्र, भारत सर्वधर्मीयांचा आहे, असे म्हटले की अनेकांना वाईट वाटते. देशात बेरोजगारी, महागाई,बलात्कार हे प्रश्न आहेत. या देशाला जातीच्या नावावरून वाटले जात आहे. योगी आदित्यनाथ मुस्लिम असा मुस्लिम तसा, मुस्लिमांच्या एवढ्या पत्नी यावर ते बोलतात. योगी जातीचं राजकारण करणार नाही असे का सांगत नाहीत?, असा सवाल ओवेसी यांनी विचारला.

अकबरुद्दीन ओवेसींची मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा

मराठा आरक्षणसाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांना सांगतो आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. देशात अत्याचार मुस्लिम, दलित, याच्यावर होतात. त्यामुळे मराठा दलित, मुस्लिम एकत्र करून येऊन अत्याचार विरोधात लढू. मराठा आरक्षण करणाऱ्या जरांगे यांना सांगतो की, फक्त मराठा समाज मागास नाही, तर संपूर्ण मराठवाडा मागास आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक मागास मराठवाडा आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामुळे आरक्षण सोबत मराठवाड्याच्या विकासाठी पुढे येऊ. मराठवाड्यात राहणारा प्रत्येक मराठा आहे. तीस वर्षे झाले मराठवाड्यासाठी विकास महामंडळ झाले ,पण पैसे नाहीत. मी मराठवाडा विकाससाठी 50 हजार करोडची मागणी करतोय. शहराचे नाव बदलून पोळी मिळणार आहे का, शेतकरी आत्महत्या थांबणार आहेत का?, असा सवाल अकबरुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित केला.

एमआयएमचे 10 आमदार निवडून आले तर ठाकरे-पवार-शिंदे कोणीच सत्तेत बसू शकत नाही: ओवेसी

मी उघडपणे सांगतो मोदी आणि योगी यांचा शत्रू आहे. नीती आयोग सांगतो की मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. मी सोबत येतो, मराठा,मुस्लिम, दलित आणि हिंदू यांना सोबत घेऊन मराठवाड्यसाठी लढू. मराठा मुख्यमंत्री नको पाहिजे, मराठवाड्यात पाणी पाहिजे, मराठा पालकमंत्री नको तर मराठा समाजाला त्याचा हक्क पाहिजे. शरद पवार गॅरंटी देणार का तुम्ही निवडणूक नंतर तुम्ही मोदी सोबत जाणार नाही. अजित पवार गॅरंटी देणार की पुन्हा शरद पवारकडे जाणार नाही. उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर तुम्ही चायवाल्या कडे नाही जाणार आणि शिंदे गॅरंटी देणार का ते पुन्हा उद्धव ठाकरेकडे जाणार नाही.

काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊन अप्रत्यक्षपणे हिंदुत्वव स्वीकारले आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणे आमचं लक्ष्य आहे. एमआयएममधून गेलेल्या लोकांनी पुन्हा परत यावं, काही चुकलं असेल तर मी माफी मागायला तयार आहे. जे कुणी नाराज असेल तर विनंती करतो पुन्हा परत या. आमचे 10 आमदार आल्यावर ना ठाकरे ,ना शिंदे , ना पवार, कुणीच सत्तेवर बसू शकत नाही, असेही अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटले.

आणखी वाचा

ही रेवडी नाही का? मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या विरोधात ओवेसी मैदानात, शिंदे सरकारला परखड सवाल

from 100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर 05 November 2024 https://ift.tt/vwHKDJo

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area