Ads Area

ABP Majha Headlines : 6:30 AM : 13 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी फाईल का दाखवली? आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांनी केलं आहे. निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024) संपण्याची वाट पाहते आहे, त्यानंतर केस करणार असल्याचा इशाराही खासदार सुप्रीया सुळे यांनी दिला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सुप्रीया सुळे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रीया सुळे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजित पवार स्वतः भाषणात म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवलीच कशी? आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार, निवडणूक संपण्याची वाट पाहते आहे.त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी दिला आहे. असं केलं असेल तर, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागण्याची देखील मागणी सुप्रीया सुळे यांनी केली आहे.

"फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल, कारण देवेंद्र फडणवीस यांना, ऑन ओथ जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुखमंत्री असतो, फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार नाही. ज्या व्यक्तीवर आपण केस करतो, त्या व्यक्तीला आपण बोलवून आपण फाईल दाखवतो हे योग्य आहे? हा संविधानाचा अपमान आहे. आणि म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं आहे की, याचं उत्तर स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, त्यांनी फाईल कशी दाखवली आणि का दाखवली?", असं देखील सुप्रीया सुळे म्हणाल्या आहेत.

from Zero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरच https://ift.tt/GL3jBzb

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area