<p>Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha </p> <p> भारतीय जनता पार्टीने नितेश राणे यांना कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर निलेश राणे हे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. निलेश राणेंना शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश जवळपास निश्चित झालाय. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेदेखील राणेंच्या दोन्ही मुलांविरोधात उमेदवार जाहीर केले आहेत. राणेंविरोधात ठाकरेंचे उमेदवार जाहीर नितेश राणे यांच्या विरोधात काँग्रेसने संदेश पारकर यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे कुडाळ मालवणमधून माजी खासदार निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्याविरोधात ठाकरेंकडून वैभव नाईक हेच उमेदवार असणार आहेत. निलेश आणि नितेश राणेंविरोधात उमेदवारी मिळालेले दोन्ही नेते नारायण राणेंचे कट्टर वैरी मानले जातात. कणकणली देवगड विधानसभेत उमेदवारी मिळालेले संदेश पारकर कोण आहेत ? संदेश पारकर यांच्या कारकि‍र्दीला कणकवली कॉलेजच्या GS पदापासून सुरुवात झाली. त्यांनी 10 वर्षे कणकवलीचे सरपंच म्हणून काम केले. कणकवली पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं. 1999 साली तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात निवडणूक लढवून कडवी झुंज दिली. 2003 साली नारायण राणे ऐन राजकीय भरात असताना संदेश पारकर एक हाती निवडणूक जिंकून कणकवली शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले. संदेश पारकरांची कणकवली शहरावर 15 वर्षे एक हाती सत्ता नारायण राणेचं होम पीच असणाऱ्या कणकवली शहरावर 15 वर्षे एक हाती सत्ता मिळवली. सरपंच व नगराध्यक्ष कालखंडात कणकवलीचे कायापालट करून शहर म्हणून नावारूपास आणले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद भूषवत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला अश्या अनेक शहरांची सत्ता मिळवली. त्या यशाची दखल घेऊन त्यांना राष्ट्रवादी सरचिटणीस पदाची जबाबदारी देऊ राज्यात काम करण्याची संधी दिली. कोकण पर्यटन महामंडळाचे उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. </p>
from Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी https://ift.tt/tBPezAX
Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
October 24, 2024
0