Latur News : लातूर शहरातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलींना भोजनातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. भेंडीची भाजी चपाती आणि वरण खाल्ल्यानंतर मुलींना मळमळ उलटीचा त्रास जाणवू लागला. त्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी आरोग्य विभागातील कर्मचारी आणि वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी बाधित मुलींना तात्काळ लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. 324 मुलींपैकी 60 मुलींना विषबाधेचा त्रास झाला आहे.

जुवण केल्यानंतर मुलींना होऊ लागला मळमळ आणि उलटीचा त्रास

मळमळ व उलटी चा त्रास जाणवणाऱ्या चाळीस मुलींना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणाची प्रकृती चिंताजनक नाही. लातूर शहरातील औसा रोडवर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन आहे. या महाविद्यालयाच्या वस्तीगृहात 324 मुली राहतात. नेहमीप्रमाणे रात्री 7 वाजता मुलींनी भात चपाती भेंडीची भाजी आणि वरण भोजन केले. त्यानंतर साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही मुलींना मळमळ होऊन उलटीचा त्रास जाणवू लागला. या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळाल्यानंतर ते तात्काळ वसतिगृहात दाखल झाले. त्यांनी लगेच वैद्यकीय महाविद्यालयात संपर्क साधला. तात्काळ रुग्णवाहिका पाठवण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ही त्या ठिकाणी दाखल झाले होते. मळमळ आणि उलटीचा त्रास होणाऱ्या मुलींना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री एक वाजेपर्यंत जवळपास 60 मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर तात्काळ उपचार करीत आहे. कोणाची प्रकृती गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, महाविद्यालयाचे अधिष्ठता डॉ. उदय मोहिते हे रुग्णालयात दाखल होऊन आवश्यक त्या सूचना करीत आहेत.

सर्व मुलींची प्रकृती चांगली

सर्व मुलींची प्रकृती चांगली आहे. 60 मुलींवर उपचार सुरू आहेत. खबरदारीचे उपायोजना म्हणून इतर मुलींचींही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ते काम सुरू आहे. डॉक्टरांचे एक पथक वसतिगृहातही दाखल झाला आहे. सुदैवाने कोणाचीही प्रकृती गंभीर नाही. सर्व बाधित मुलींची प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे अशी माहिती डॉ. उदय मोहिते, अधिष्ठाता विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी दिली आहे.

सर्व मुलींची आरोग्य तपासणी केली

रात्रीचे भोजन झाल्यानंतर वसतिगृहातील दोन मुलींना मळमळ होऊन उलटी झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही तात्काळ दाखल झालो. ही संख्या वाढू लागली. त्रास जाणवणाऱ्या सर्व मुलींना विना विलंब शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारसाठी पाठवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती चांगली आहे. कुठलाही धोका होऊ नये म्हणून सर्व मुलींची आरोग्य तपासणी करून घेत आहोत. त्यामुळे काळजी करू नये अशी माहिती पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन चे प्राचार्य व्ही.डी. नितनवरे यांनी दिली आहे.

लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात दिली भेट

लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी वैद्यकीय महाविद्यालयात भेट देत बाधित विद्यार्थिनींची चौकशी केली. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याबरोबर चर्चा केली. वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता हे स्वतः ह्यात लक्ष घालत आहे. घटनेची माहिती मिळताच आरोग्य यंत्रणा सजग झाली आहे काम सुरू आहे. मुलींची प्रकृती स्थिर आहे. यातील दोषी लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. फूड पॉइजनिंग का झाली याची कारणे तपासानंतर समोर येतील. सुदैवाची बाब म्हणजे सर्व मुलींची प्रकृती स्थिर आणि उत्तम आहे असे मत खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बिस्कीटातून विषबाधा झालेल्या जि.प. शाळेतील 7 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर, उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवले

from ABP Majha Headlines : 11 PM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/pXm2WYs
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा, उपचार सुरु, प्रकृती धोक्याबाहेर
October 05, 2024
0