Raigad Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhan Sabha Election 2024) सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. यंदाच्या निवडणुकीत महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi), अशीच लढत पाहायला मिळणार आहे. तर, अद्याप काही जागांवर तिढा कामय आहे. अशातच रायगडमध्ये एकूण सात जागांपैकी पाच जागांवर महाविकास आघाडीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या सर्व पाच जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेल्या असून नवे चेहरे यंदाची विधानसभा निवडणूक (Raigad Vidhan Sabha Nivadnuk) लढवणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मतदारसंघातून या नव्या चेहऱ्यांना मतदारांची कशी पसंती मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अलिबागमधून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी चार उमेदवारांची मंगळवारी घोषणा केली. यावेळी त्यांनी आम्ही मविआसोबत राहून लढू. मात्र, आज अलिबागमधून महाविकास आघाडीची सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी घोषीत झाल्यानंतर या मतदार संघात आता तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. या लढाईत आता कोणाच्या पदरात किती मतं पडणार? हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळेल.

अलिबागच्या जागेवर यापूर्वी शिवसेनेचा उमेदवार जिंकून आल्यानं ही जागा पुन्हा ठाकरेंच्या सेनेला मिळावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात आता सुरेंद्र म्हात्रे यांना रणांगणात उतरवलं आहे. त्यामुळे दळवी आणि म्हात्रे यांच्या लढाईत शेकापच्या चित्रलेखा पाटील कोणतं आव्हान या उमेदवारांना देणार? याची चर्चा रंगू लागली आहे.

पेण सुधागड मतदार संघात देखील युतीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आली नाही. विद्यमान आमदार रवी पाटील यांच्या वयाचा विचार करता, त्यांना भाजपनं उमेदवारी देण्याबाबत थांबा घेतला आहे. त्यांचे सुपुत्र वैकुंठ पाटील उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र, वैकुंठ पाटील यांना जनतेतून पाहिजे तितकी पसंती मिळतं नसल्यानं भाजपनं अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपमधून बंडखोरी करतं अपक्ष लढण्याच्या तयारीत असणारे प्रसाद भोईर यांनी मात्र, थेट मातोश्री गाठली आणि उमेदवारीच जाहीर करून आणली. त्यामुळे भोईर यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानं आता त्यांना पक्षाची ताकद सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे अगोदरच भाजपमध्ये असताना युवा वर्गाची मोठी ताकद त्यांनी आपल्या पाठीशी बांधून ठेवली होती. ती फळी भोईर यांना निवडणुकीसाठी कामी येणार आहे. त्यांचा बोलबाला या मतदार संघात जास्त असल्यानं भाजप पुढे आता मविआचे उमेदवार प्रसाद भोईर यांचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळे ऐन वेळेस भाजप रवी पाटील यांच्या बदल्यात कुणाला उमेदवारी देईल? हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शेकापकडून या मतदार संघात नवा चेहरा असलेल्या अतुल म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तरी प्रसाद भोईर आणि त्यांच्यात लढाई झाल्यास कोणाला जास्त मताधिक्य असेल? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

रायगडमध्ये कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी?

महाड पोलादपूर विधानसभा

भरत गोगावले (शिंदे गट) विरूद्ध स्नेहल जगताप (ठाकरे गटाकडून, मविआ)

श्रीवर्धन मतदार संघ

आदिती तटकरे (महायुती) विरूद्ध (अद्याप उमेदवार ठरलेला नाही) तरी मविआकडून अनिल नवगने किंवा ज्ञानदेव पवार यांच्या नावाची चर्चा

पेण सुधागड मतदार संघ

प्रसाद भोईर (मविआ, उबाठा-अधिकृत) विरुद्ध शेकापचे अतुल म्हात्रे यांच्यात खरी लढत

अलिबाग मतदार संघ

महेंद्र दळवी (शिंदे गट) महायुती विरूद्ध चित्रलेखा पाटील (शेकाप) आणि सुरेंद्र म्हात्रे (उबाठा) मविआ मात्र खरी लढत ही महेंद्र दळवी आणि चित्रलेखा पाटील यांच्यात होणार

कर्जत खालापूर मतदार संघ

महेंद्र थोरवे (शिंदे गट) विरूद्ध नितिन सावंत (ठाकरे गट), सुधाकर घारे (अपक्ष); मात्र खरी लढत ही थोरवे आणि सावंत यांच्यात होण्याची शक्यता

उरण मतदार संघ

महेश बालदी (भाजप) विरूद्ध मनोहर भोईर (ठाकरे गट) आणि प्रितम म्हात्रे (शेकाप) मात्र, खरी लढत ही महेश बालदी आणि प्रितम म्हात्रे यांच्यात होण्याची शक्यता

from Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी https://ift.tt/Mk2ON3z
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
October 24, 2024
0