<p>Baba Suddique shot dead : गोळीबारानंतर अनेक बाॅलिवूड स्टार बाबा सिद्दिकींच्या तपासासाठी रूग्णालयात </p> <p>महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. पण त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला झाला तेव्हा सिद्दीकी निर्मल नगर भागातील आपल्या कार्यालयातून निघून गाडीत बसले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी लपून त्यांच्यावर गोळीबार केला. पण आता मोठी बातमी म्हणजे बाबा सिद्दिकी हत्येचे <a title="पुणे" href="https://ift.tt/3HGI7Zw" data-type="interlinkingkeywords">पुणे</a> कनेक्शन समोर आले आहे. तिन्ही आरोपींना पुण्यातून बोलवल्याचा संशय वक्त केल्या जात आहे.</p> <p>तिन्ही आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर जवळपास सहा गोळ्या झाडल्या सांगण्यात येत आहे. एक आरोपी हा हरियाणातील आहे तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आता समोर आली आहे. तिघांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सिद्दिकी यांच्या हत्येमागे एका बड्या गँगस्टरचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामागे सलमान खान कनेक्शन असून बिश्नोई गँगचा त्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.</p>
from ABP Majha Headlines : 7 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/wyAtjgR
Baba Suddique shot dead : गोळीबारानंतर अनेक बाॅलिवूड स्टार बाबा सिद्दिकींच्या तपासासाठी रूग्णालयात
October 12, 2024
0