<p> ABP Majha Headlines : 7 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स</p> <p> महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांसह छोट्या पक्षांकडून महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जात आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्ष प्रत्येकी 90 जागांवर लढणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. मुंबईतील जागा वाटपाबाबत मविआत अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. आतापर्यंत महाविकास आघाडीकडून मुंबईतील 23 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून 18 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर, काँग्रेसनं 4 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं एका जागेवर उमेदवार दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणत्या जागांवर उमेदवार जाहीर? ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा,अंधेरी पूर्व, विलेपार्ले, चेंबुर, कलिना, कुर्ला, वांद्रे पूर्व, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरेंचे उमदेवार : ठाकरेंच्या शिवसेनेकडून मागाठाणे -उदेश पाटेकर, विक्रोळी-सुनील राऊत, भांडूप पश्चिम-रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्व-अनंत नर, दिंडोशी-सुनील प्रभू, गोरेगाव-समीर देसाई, वर्सोवा-हरुन खान,अंधेरी पूर्व-ऋतुजा लटके, विलेपार्ले-संदीप नाईक, चेंबुर-प्रकाश फातर्पेकर, कलिना-संजय पोतनीस, कुर्ला- प्रविणा मोरजकर, वांद्रे पूर्व- वरुण समरदेसाई, वडाळा- श्रद्धा जाधव, माहीम- महेश सावंत, वरळी- आदित्य ठाकरे, शिवडी- अजय चौधरी, भायखळा- महेश जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून चार जागांवर उमदेवार जाहीर काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम,चांदिवली, मुंबादेवी,धारावी या चार जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसनं आतापर्यंत मालाड पश्चिम-अस्लम शेख,चांदिवली- नसीम खान, मुंबादेवी- अमनि पटेल,धारावी- ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून घाटकोपर पूर्वच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. अद्याप जाहीर न झालेल्या जागा बोरिवली, दहिसर, मुलूंड, कांदिवली पूर्व, चारकोप, अंधेरी पश्चिम,घाटकोपर पश्चिम,मानखुर्द शिवाजीनगर, अणूशक्तीनगर,वांद्रे पश्चिम,सायन कोळीवाडा,मलबार हिल, कुलाबा या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.</p>
from Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार? https://ift.tt/rWUTcn3
ABP Majha Headlines : 7 AM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
October 25, 2024
0