<p> ABP Majha Headlines : 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स</p> <p>मनोज जरांगे यांच्या येवल्याच्या दौऱ्यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं. मनोज जरांगे यांनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ समर्थक आमने-सामने आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होऊन इंदुर-पुणे महामार्गावर रास्तारोको केला. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर मात्र मराठा आंदोलकांनी माघार घेतली आणि वाहतूक सुरळीत झाली. येवल्यात नेमकं काय घडलं? मनोज जरांगे हे छगन भुजबळांचा मतदारसंघ असलेल्या येवल्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणच्या शिवसृष्टीला मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. त्यानंतर मराठा आंदोलक आणि छगन भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं. यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी शिवसृष्टी समोर ठिय्या मांडला. इंदुर-पुणे महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्तारोको केला. येवल्यात जरांगे समर्थकांनी इंदुर-पुणे महामार्ग रोखला. त्याचवेळी जरांगे आणि भुजबळ समर्थकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. </p>
from Baba Siddique | बाबा सिद्दीकींची हत्या, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं Special Report https://ift.tt/BdYXPiw
ABP Majha Headlines : 7 AM : 14 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
October 13, 2024
0