<p> ABP Majha Headlines : 6:30 AM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स </p> <p>सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) काय सुरूये, असं सहजंच कुणी विचारलं तर, सर्वांच्या तोंडी दोन नावं येतील. सलमान खान (Salman Khan) आणि लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi). सध्या बॉलिवूडमध्ये या दोन नावांचाच सर्वाधिक उल्लेख होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अलिकडेच माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्विकारल्याचं बोललं जात आहे. तेव्हापासून या प्रकरणात सलमान खान कनेक्शनही चव्हाट्यावर आलं आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीनं यापूर्वीही सलमान खानच्या घरावर हल्ला करून धमक्या दिल्या आहेत. या सगळ्या दरम्यान सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.</p> <p>सलीम खान यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या स्फोटक मुलाखतीतून अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. सलमानला मिळालेल्या धमकीची धग साहजिकच खान कुटुंबियांना बसतेय. या सगळ्यावर सलीम खान यांचं म्हणणं काय? सद्यस्थितीकडे ते कसं पाहतायत? अशा असंख्य प्रश्नांवर सलीम खान बेधडकपणे व्यक्त झाले आहेत. एबीपी न्यूजच्या पॉलिटिकल एडिटर मेघा प्रसाद यांनी सलीम खान यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत 'खतरे मे सलमान, एक्स्क्लुझिव्ह सलीम खान' घेतली असून त्यामध्ये सलीम खान यांनी थेट वक्तव्य करत, सलमान खान माफी मागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. </p> <p>सलमाननं कधीही प्राण्यांची शिकार केलेली नाही, सलमानला मिळणाऱ्या धमक्या केवळ खंडणीसाठी, आम्ही कुणाचीही माफी मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी घेतली आहे. </p>
from Rajkiya Shole : जागांवरून खटका कुणाला झटका ? 18 ऑक्टोबर 2024 : ABP Majha https://ift.tt/CIysUfm
ABP Majha Headlines : 6:30 AM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
October 18, 2024
0