Ads Area
Nashik News : नाशिकमधील अवैध गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर, महात्मानगरच्या हॉस्पिटलवरील कारवाईनंतर मनपाचा मोठा निर्णय
नाशिक : नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) आरोग्य विभागाच्या पथकाने (Health Department) महात्मानगर परिसरातील पंड्या हॉस्पिटलवरील छापा (Raid) मारून अवैधरीत्या सुरू असलेले गर्भपात केंद्र उघडकीस आणले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर नाशिक शहरातील गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, महात्मानगर सारख्या उच्चभ्रू वस्तीतील पांड्या हॉस्पिटलमध्ये (Pandya Hospital) हा प्रकार मागील कित्येक वर्षापासून सुरू होता. मनपाच्या वैद्यकीय पथकाच्या छाप्यात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माता मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ही गंभीर बाब निदर्शनास आली.
गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या आढळल्या
पंड्या हॉस्पिटलमध्ये गेल्या मे महिन्यात पिंपळद येथील मातेची प्रसुती झाली. प्रसुतीनंतर तिला दुसऱ्या हॉसिपटलमध्ये हलविले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यासंदर्भातील चौकशी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या उपस्थितीत माता मृत्यू अन्वेशन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर समिती सदस्यांनी सोमवारी दुपारी पंड्या हॉस्पिटल येथे झडतीसत्र राबविले. यावेळी गंभीर बाबी निदर्शनास आल्या. याठिकाणी गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या व इंजेक्शन्स मिळून आले.
गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
2009 पासून ते आजपर्यंत पंड्या हॉसिपटलचा महाराष्ट्र नर्सिंग होम अॅक्ट अन्वये परवाना नुतनीकरण न करता अवैधरित्या हॉस्पिटल सुरू ठेवून शासनाची फसवणूक केली, रुग्णांच्या नोंदवही ठेवली नाही, गर्भपात करण्यासाठीच्या गोळ्या बाळगून अवैधरित्या गर्भपात केंद्र चालविणे, हॉस्पिटलची मनपाकडे नोंदही करण्यात आलेली नाही. या प्रकरणी डॉ. आर. एम. पंड्या यांच्याविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
गर्भपात सेंटर आरोग्य विभागाच्या रडारवर
इतर महत्वाच्या बातम्या
आमच्या हॉटेलमध्ये बीफ तयार केलं जात नाही, लाहोरी बारच्या मालकाने स्वतःहून पोलीस स्टेशन गाठले, सुषमा अंधारेंचे आरोपही फेटाळले
<a href="https://ift.tt/R0K52WH Accident: ऑडी हिट अँड रन प्रकरणातील कारचे RTO अधिकाऱ्यांकडून इन्स्पेक्शन; कारच्या स्पीड बाबत माहिती समोर
from TOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha https://ift.tt/VXPmTbD
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area