Edible Oil : सरकारनं कच्च्या तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, घोषणा होताच राज्यभरात खाद्य तेलाच्या दरात (Edible Oil Price) मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. खाद्या तेलाच्या दरात प्रति किलो 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याच समोरं आलं आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांना झटका बसला आहे.

एकीकडे सरकारने कालच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा केली आहे. आयात करण्यात येणाऱ्या कच्या तेलावर वर आयात शुल्क ही 10 टक्क्यांनी वाढवलं आहे. मात्र, यानंतर दुसरीकडं खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यानं ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे.

कोणत्या तेलाला किती दर?

पहिला दर आजचा दर

सोयाबीन - 110 130
शेंगदाना - 175 185
सूर्यफुल - 115 130

अचानक खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकाला झळ

आज अचानक खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने सामान्य ग्राहकाला याची झळ बसली आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. सरकारनं ती मागणी मंजूर केली आहे. केंद्र सरकारकडून कच्चे सोयाबीन,पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात 20 टक्क्यां पर्यंत वाढ तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यांवरुन वरून 35.75 टक्के वाढवण्यात आलं आहे. सोयाबीन दरवाढीसाठी तेलावरील आयात शुल्कात 20 ते 30 टक्के वाढ करावी ही मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं देशातील सोयाबीन (soybeans) बासमती तांदळासह (Basmati Rice) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं कांदा, बासमती तांदळावरील निर्यातमूल्य हटवले आहे. तसेच खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तेलावरील आयात शुल्क वाढवण्याच्या निर्णयानंतर खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा मोठा फटका सामान्य ग्राहकांन बसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

कांद्यासह तांदळावरील निर्यात मूल्य हटवले, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवले, सरकारच्या निर्णयाचं अजित पवारांकडून स्वागत

from Top 25 news : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 14 Sep 2024 : ABP Majha https://ift.tt/u6ve8j0
Edible Oil : सर्वसामान्य ग्राहकांना झटका, खाद्य तेलाच्या दरात मोठी वाढ, कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर दरवाढ
September 14, 2024
0