Ads Area

मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषणाला केली सुरुवात; आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, सरकारला इशारा

Manoj Jarange Patil Maratha Reservation जालना: जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा सहाव्यांदा उपोषणाला बसले. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तसेच हैदराबाद सातारा आणि बॉम्बे गव्हर्मेंटचे गॅझेट लागू करावे यासह मराठा आंदोलकावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी मंगळवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरवात केली आहे.

पुन्हा मला दोष देऊ नका- मनोज जरांगे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही संधी दिली असून पुन्हा मला दोष देऊ नका, असं मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) म्हणाले. तसेच आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला. आजपासून मी राजकीय विषयावर बोलणार नाही. मी आंदोलन करतो , कोणाची वाट बघत बघत नाही. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही. त्यामुळे राजकारणाचा एकही शब्द बोलणार नाही. राज्य सरकारने आमच्या मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नंतर बोंबलू नये, असंही मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पाटील हा फक्त मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसला आहे. निवडणुकीशी आम्हाला देणे घेणे नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.

आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी-

मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता. मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

संबंधित बातमी;

Manoj Jarange: सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर देवेंद्र फडणवीस जबाबदार: मनोज जरांगे

मोठी बातमी! आचारसंहितेपूर्वीच जीआर निघणार, धनगरांचा प्रश्न मिटणार; पडळकरांचा दावा, जरांगेंना टोला

from Ajit Pawar Ganpati Darshan At Sagar Banglow : अजित पवारांनी घेतले सागर निवासस्थांनी बाप्पाचे दर्शन https://ift.tt/hVxrozT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area