India Monsoon News : सध्या देशातील काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. दरम्यान, यावर्षी देशभरात चांगला पाऊस झाला आहे. आता मान्सूनला (Monsoon) परतीचे वेध लागले आहेत. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा ( मान्सून) परतीचा प्रवास 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत होण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात देखील पुढीलव तीन ते चार दिवस पावसाची विश्रांती पाहयला मिळणार आहे. त्यामुळं अनंत चतुर्दशीच्या दिवशी पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे.

15 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडणार

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजपासून पाऊस महाराष्ट्रातील विविध भागात विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सध्या 15 ते 16 सप्टेंबरपर्यंत पावसाचा खंड पडणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता आहे. त्यानंतर 27पासून पुन्हा मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी देशासह राज्यात चांगला पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपे७ा अधिक पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्यामुळं शेतकरी समाधानी असल्याचे दिसत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी राज्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची चिंता मिटली आहे.

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/tLXoRnA Weather: राज्यात आज कुठं कुठं पाऊस पडणार का? हवामान विभागाचा आजचा अंदाज काय?

from ABP Majha Headlines : 7.00 AM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/B4C8Dfq
मान्सूनला परतीचे वेध! 'या' तारखेपासून परतीचा प्रवास होणार सुरु, अनंत चतुर्दशीला पाऊस विश्रांती घेणार
September 12, 2024
0