Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 13 ऑगस्ट 2024: ABP Majha

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार, लाडकी बहीण योजनेचेही होणार सादरीकरण
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बोलावली महत्वाची बैठक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रमेश चेन्निथला राहणार उपस्थित
भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची आज बैठक, मुंबईतील जागांबाबत होणार चर्चा,आशिष शेलारांसह सर्व सदस्य राहणार उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद, आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी
मनोज जरांगेंची शांतता रॅली आज नाशकात,भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगें काय प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष
मराठा आरक्षणाविरोधातील सर्व याचिकांवर आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी, नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावर सुनावणी अपेक्षित
५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याशिवाय आरक्षणप्रश्न सुटणं कठीण, केंद्राच्या कोर्टात चेंडू टोलवताना पवारांची भूमिका, जरांगे-हाकेंसह सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचं आवाहन
मोकळं करा म्हणणाऱ्या फडणवीसांनाच विधानसभेत जागावाटपाचे सर्वाधिकार, कालच्या मुंबईतील बैठकीत निर्णय, १५० जागांचा भाजपचा आग्रह कायम
दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर..११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीची तर २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा
स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीचं कोकणी लोकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य..मनसेकडून कारवाईची मागणी तर मुनव्वरला लवकरच मालवणी हिसका दाखवणार, नितेश राणेंचा इशारा

from 9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 12 Aug 2024 : ABP Majha https://ift.tt/bZ8UTKC
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 13 ऑगस्ट 2024: ABP Majha
August 12, 2024
0