<p><strong>मुंबई :</strong> बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना (Badlapur Minor Abuse) समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. गेल्या आठवडाभरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले जाणार आहे.</p>
from ABP Majha Headlines : 6:30 AM : 24 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/cOhRogK
Maharashtra Bandh Today Live : महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजप देणार प्रत्युत्तर, ठिकठिकाणी होणार धरणे आंदोलन
August 23, 2024
0