Ads Area

राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात; मध्यरात्री कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई!

Sidhudurga Rajkot Fort Case : सिंधुदुर्गमधील (Sidhudurga News) पुतळ्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट आरोपी चेतन पाटीलवर (Chetan Patil) गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील (Kolhapur) शिवाजी पेठ इथल्या घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. अशातच आता चेनत पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटीलला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

याप्रकरणातील अन्य आरोपी जयदीप आपटे हादेखील सध्या फरार आहे. जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र, पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले होते, त्यावेळी त्याच्या घराला टाळे होते. यानंतर पोलिसांनी माहेरी गेलेल्या जयदीप आपटे याच्या पत्नीची चौकशी केली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडने गुरुवारी जयदीप आपटेच्या घराबाहेर निदर्शन केली. त्यामुळे आता पोलीस जयदीप आपटेला कधी पकडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

चेतन पाटील याला आता मालवण पोलीस ठाण्यात आणले जाणार असून त्याची कसून चौकशी केली जाईल. या चौकशीतून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी आणखी कोणती नवी माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल. चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट असून त्याच्या दाव्यानुसार पुतळ्यासाठी जे फाऊंडेशन (चबुतरा) उभारला होता, त्याचे डिझाईन त्याने नौदलाला तयार करुन देण्यात आले होते. यापलीकडे त्याला नौदलाकडून कोणतीही वर्क ऑर्डर किंवा पत्र प्राप्त झाले नसल्याचे चेतन पाटील याने अगोदरच स्पष्ट केले होते.

चेतन पाटीलनं फेटाळलेले आरोप

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याप्रकरणी पोलिसांनी जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील (Chetan Patil) या दोघांवर गुन्हा दाखल केलेला. चेतन पाटील यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेले. मी शिवाजी महाराजांच्या संपूर्ण पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं नाही. मी फक्त या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचं स्ट्रक्चरल डिझाईन करून दिलं होतं. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम केलं होतं, ते ठाण्यातील कंपनीनं केलं होतं, असं चेतन पाटीलनं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी करणारा ठाण्यातील जयदीप आपटे (Jaydeep Apte) या तरुणाचा शोध सुरू होता. दरम्यान, सध्या चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जयदीप आपटेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पाहा व्हिडीओ : Chetan Patil Arrest : राजकोट किल्ल्याचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/AXfTcNu Maharaj Statue: सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ठाण्यातील जयदीप आपटे नेमका कोण?

from Story Shivaji Maharaj First Statue : सर्वप्रथम सर्वश्रेष्ठ, कहाणी पहिल्या पुतळ्याची https://ift.tt/9aJOuVF

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area