मुंबई : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून सध्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकून तीन हजार रूपये दिले जात आहेत. अर्ज अद्याप मंजूर न झालेल्या पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये दिले जाणार आहेत. याच कारणामुळे सध्या महिलांची बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी, पैसे आले आहेत का? हे तपासण्यासाठी तसेच आधार क्रमांक बँक खात्याला लिंक करण्यासाठी (Aadhaar Bank Seeding) महिला मोठ्या प्रमाणात बँकेत गर्दी करत आहेत. याच कारणामुळे आता बँक कर्मचारी संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्र्यांनी बँकेत सुरक्षा पुरवावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.

सुरक्षा पुरवण्याची बँक संघटनांची मागणी

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. मात्र ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसै मिळाले नाहीत अशा महिला बँकेत गर्दी करत आहेत. सोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी, आधार लिंक स्टेटस पाहण्यासाठीही महिलांची बँकेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आपले काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी अनेक महिला बँक कर्मचाऱ्यांशी भांडणही करत आहेत. याच कारणामुळे महिलांची बँकांत होणारी वाढती गर्दी लक्षात घेता बँख कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना बँकेत सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.

20 टक्के बँक खात्यांची केवायसी नाही

बखेत होणारी गर्दी पाहाता सुरक्षा आणि अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात यावे अशी बँख कर्मचारी संघटनेच्या वतीने पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागण्यात आली आहे. बँकेत नव्याने उघडण्यात आलेल्या बँक खात्यांपैकी 20 टक्के बँक खात्यांची केवायसी झालेली नाही. त्यामुळे केवायसी करण्यासाठी गर्दी होत असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे आता राज्य सरकार बँक संघटनांच्या या मागणीची दखल घेणार का? बँकेत महिलांची होत असलेली गर्दी लक्षात घेता, सरकारी काही उपायोजना करणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा :

आणखी 16 लाख लाडक्या बहिणींना सरकारचं गिफ्ट, खात्यावर आले 3000 रुपये, लगेच करा चेक!

लाडक्या बहीणींना आणखी एक खुशखबर, अर्जाबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय; लाखो महिलांना होणार फायदा!

तुमच्या खात्यात अजून 3000 रुपये आले नाहीत? आता काय करावं? 'या' तीन गोष्टी समजून घ्या

from ABP Majha Headlines : 07:00 AM : 18 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/rliwaso
लाडक्या बहिणींची बँकांत मोठी गर्दी, कर्मचाऱ्यांशी भांडण, बँक संघटनांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; सुरक्षा पुरवण्याची मागणी!
August 17, 2024
0