Maharashtra Rain : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात ऐला आहे. राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. तर कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आलाय. जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा सविस्तर अंदाज.

राज्यातील 'या' भागात जोरदार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह मराठवाडा, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रात काही ठिकाणी कडक ऊन देखील पडणार आहे. जिथे कडक ऊन पडणार त्या ठिकाणी चांगला पाऊसही पडणार असल्याचे डख महणाले.

उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार

जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. मात्र, आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पजाबराव डख यांनी दिली आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. डखांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

नदी-नाले भरुन वाहणार, 5 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात खूप मोठा पाऊस पडणार, पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज

from Special Report Ajit Pawar VS Supriya Sule : वेशांतर पुरावे द्या, नाहीतर संन्यास घ्या, दादांचं आव्हान https://ift.tt/5QPsqXR
सावधान! राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हमानाचा अंदाज
August 02, 2024
0
Tags