ABP Majha Headlines : 6:30 AM : 8 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

पैलवान विनेश फोगटचा जड अंत:करणाने कुस्तीला अलविदा, ऑलिम्पिक कमिटीच्या निर्णयामुळे कोडमडून गेल्याची एक्सवर पोस्ट
१०० ग्रॅम वजन अधिक भरल्यानं विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र...तर विनेशचं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपात्रतेविरोधात अपील, आज अंतिम निर्णय अपेक्षित
पॅरिस ऑलिम्पिक महिला वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या मीराबाई चानूला कांस्यपदकाची हुलकावणी, तर पुरुषांच्या तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत महाराष्ट्राचा अविनाश साबळे अकराव्या स्थानावर
ऑलिम्पिकमध्ये आज भालाफेक पुरूष गटाची अंतिम फेरी, गोल्डन बॉय निरज चोप्राकडून देशवासीयांना पुन्हा सुवर्णपदकाची आशा.
ऑलिम्पिक मध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाचा आज कांस्यपदक सामना, स्पेन विरूद्ध होणार कांस्यपदकाची लढाई.
निवडणूक जाहीर होण्याआधीच येऊ शकते
भाजपची पहिली यादी, ३० ते ४० जागा
लवकरच जाहीर होण्याची शक्यता- सूत्रांची माहिती. मध्य प्रदेशची रणनीती महाराष्ट्रातही भाजप राबवणार?
राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा दिंडोरी विधानसभा मतदारसंघातुन शुभारंभ होणार. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, मंत्री उपस्थित राहणार.
मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली असती तर पूर्ण पक्षच घेऊन आलो असतो, त्यांनी फक्त आमदारच आणले...एकनाथ शिंदेंवरच्या चरित्रग्रंथाच्या प्रकाशनावेळी अजितदादांची फटकेबाजी...
शिंदे आणि फडणवीसांसमोरच मुख्यमंत्रिपद हुकल्याची खंत अजितदादांच्या तोंडून बाहेर...सर्वात सीनियर असूनही मागे राहिल्याचं वक्तव्य...
मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात राडा, वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृृत्यू झाल्याचा आरोप, दोन डॉक्टरांचं निलंबन

from Raj Thackeray vs Maratha Aandolak : राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा आंदोलकांची घोषणाबाजी https://ift.tt/YbMVQa8
ABP Majha Headlines : 6:30 AM : 8 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
August 07, 2024
0