Ads Area

दही हंडी उत्सवात 129 गोविंदा जखमी, दोघांची प्रकृती गंभीर, जखमींमध्ये बालगोविंदांचाही समावेश

Mumbai Dahi Handi 2024 : मुंबई : राज्यभरात दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दही हंडीनिमित्त ठिकठिकाणी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. एकावर एक मनोरे रचत उंचावर बांधलेल्या दही हंड्या फोडून अनेक मंडळांनी विक्रम रचण्याचा प्रयत्न केला. उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या या उत्सवाला काही ठिकाणी गालबोट लागलंच. मुंबईत संपूर्ण दिवसभरात 129 गोविंदा जखमी झाल्याचं पाहायला मिळालं. तर ठाण्यात दिवसभरात 19 गोविंदांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. चिंतेची बाब म्हणजे, जखमी झालेल्या गोविंदांमध्ये बालगोविदांचाही समावेश आहे.

एकीकडे राज्यभरात दही हंडीचा (Dahi Handi 2024) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे या उत्सवाला कुठेतरी गालबोटही लागलं. यंदा मुंबईमध्ये (Mumbai Dahi Handi) विविध ठिकाणी दही हंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत 129 गोविंदा जखमी झाले. यातील 19 गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, काही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दही हंड्या फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना उपचारासाठी मुंबईतील केईएम, नायर, सायन, कूपर या मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह जे. जे. रुग्णालय, सेंट जॉर्जेस आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दही हंडी उत्सावाच्या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या. मंगळवार सकाळपासून विविध ठिकाणी दही हंडी फोडण्यास सुरुवात झाली. दही हंडीचा उत्साह वाढत असतानाच गोविंदा जखमी होऊ लागले. मुंबईमध्ये 129 गोविंदा जखमी झाले असून त्यांच्यावर सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत.

दोन गोविंदांची प्रकृती गंभीर

दिवसभरात मुंबईत जखमी झालेल्या गोविंदांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन जखमी गोविंदांची प्रकृती गंभीर आहे. 20 वर्षीय कुणाल पाटील याच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली आहे. तर 25 वर्षांच्या मनू खारवी याच्या डोक्याला मार लागला आहे.

गोविंदा पथकांकडून नियम पायदळी

दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठमोठ्या दही हंड्यांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं होतं. यंदा अनेक गोविंदा पथकांनी दही हंडीसाठी न्यायालयानं आखून दिलेली मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. न्यायालयाच्या आदेशानुसार, गोविंदा पथकांमध्ये 14 वर्षांखालील मुलामुलींना सहभागी करण्यात आलं होतं. तर, आयोजकांनीही या मार्गदर्शक तत्वांकडे दुर्लक्ष केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/ka8U7vB Handi: मुंबईत दही हंडीचा थरार; 129 गोविंदा जखमी, दोघे गंभीर, केईएम रुग्णालयात उपचार सुरू

from Kirit Somaiya Dahi Handi :तिसऱ्या थरारवर चढून सोमय्यांची घोषणाबाजी https://ift.tt/pOQBs84

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area