Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

1. ओबीसी आरक्षणासंदर्भात सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक, सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका, बैठकीत ओबीसी नेत्यांचा सूर, प्रमाणपत्र देणं थांबवण्याचीही मागणी

2. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला न जाण्याचा विरोधकांचा निर्णय, मागच्या बैठकीत काय झालं, ते अधिवेशनात सांगण्याची विरोधकांची मागणी

3. महाराष्ट्र पेटता राहावा असे मविआचे धोरण आणि भूमिका, विरोधकांची आपली राजकीय पोळी भाजण्याची भूमिका उघड, ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांवर मुख्यमंत्र्यांची टिका

4. निवडणुकीच्य बैठकीसाठी त्यांच्याकडे वेळ आहे, मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला विरोधकांना वेळ नाही, खोटं बोलून राजकीय पोळी भाजण्याचा विरोधकांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

5. ओबीसी सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिलेल्या विरोधी पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री लिहीणार पत्र, मराठा आणि ओबीसी आरक्षणा संदर्भात पक्षाची भूमिका कळवण्याची विनंती करणार, प्रविण दरेकर यांची माहिती

6. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज रात्री 9 वाजता बैठक घेणार, विधानपरिषदेच्या निवडणूकीसंदर्भात करणार मार्गदर्शन, ताज लँड्समध्ये बैठक

7. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी शिवसेनेच्या आमदारांनाही हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार, मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये शिवसेनेकडून 60 रुम्स बुक

8. पुढील तीन दिवस भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार, विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपचे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मक्कामी

9. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार, विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी पक्षाकडून खबरदारी

10. पक्ष सोडून गेलेल्यांपैकी परत येण्याबाबत मला कोणीही भेटलं नाही, पण जयंत पाटलांना भेटल्याची माहिती आहे, शरद पवारांचं वक्तव्य

from Job Majha :स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये नोकरीची संधी : 9 July 2024 : ABP Majha https://ift.tt/tD8O5B4
Maharashtra Breaking 10th July LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
July 09, 2024
0