Maharashtra Rain News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. जाणून घेऊयात हवामानच्या संदर्भातील आजचा अंदाज.

'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा

आज राज्यात कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह ठाणे सिंधुदुर्ग, यवतमाळ, नागपूर, वर्धा आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जुलै महिन्यात राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. राज्यात जुलै महिन्यात राज्यात सरासरीच्या 138 टक्के जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. संपूर्ण राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम (Heavy Rain) राहणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागातील के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे. राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद झाली असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. पुढील 2 ते 3 दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील अनेक धरणे 90 टक्के भरले असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केलं आहे. तर पुण्यात देखील पुढील 2 ते 3 दिवस चांगला पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोणत्या विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

कोकण विभाग: 41 टक्के सरासरी पेक्षा जास्त

मध्य महाराष्ट्र विभाग : 45 टक्के सरासरी पेक्षा जास्त

मराठवाडा विभाग: 27 टक्के सरासरी पेक्षा जास्त

विदर्भ विभाग: 36 टक्के सरासरी पेक्षा जास्त

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/MqUvZof Update Maharashtra: राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त बरसला पाऊस; आणखी जोर वाढणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

from 9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 31 July 2024 : ABP MAJHA https://ift.tt/BtzDpR4
आज मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
July 31, 2024
0