Maharashtra Rain News : राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) होत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं. दरम्यामन सुरु असलेल्या या जोरदार पावसामुळं धरणांमधील (Dam) पाणीपातळीत देखील वाढ होत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेभयात सविस्तर माहिती.

'या' भागात ऑरेंज अलर्ट जारी

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात कुठं ऑरेंज तर कुठं यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती आण अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

'या' भागात पावसाचा यलो अलर्ट जारी

दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाज्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीमवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात मुसळधार झाला आहे. काल रात्रीपासून या सर्व भागांमध्ये पावसाच्या जोरदार सरी (Heavy Rain) बरसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावंर पाणी साचलं होतं, त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला होता. तसेच लोकलसेवा देखील उशीराने सुरु होती. दरम्यान, आजही मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

नागपूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस

नागपूर जिल्ह्यातही मुसळदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाल. उमरेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून शेतामध्ये ही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे. उमरेड तालुक्यातील पाचगाव परिसरात संत्र्याची बाग असो किंवा सोयाबीनचे शेत सर्वांना तळ्याचे स्वरूप आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान या पावसामुळे झाल्याचा प्राथमिक चित्र आहे. सोयाबीनची शेत आणि संत्र्याची बाग पूर्णपणे पाण्याखाली गेली असून एका तळ्याचा स्वरूप या बागेला आलेला आहे. तर तिकडे नागपूरच्या नरेंद्र नगर अंडर पास मध्ये पाणी साचल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/5Ha17rU Rain in Mumbai & Thane: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, दुपारी समुद्राला भरती; लोकल ट्रेनला तुफान गर्दी

from Vidhansabha Election Special Report: विधानसभेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी? https://ift.tt/3VDRYO5
आज राज्यात कसं असेल हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा अंदाज
July 20, 2024
0