बीड: राज्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत 'चुन चुन के गिरायेंगे' असा निर्वाणीचा इशारा ओबीसी (OBC Reservation) नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी सगेसोयरेचा जीआर काढलात तरी आगामी निवडणुकीत त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी सांगितले. ते शनिवारी बीडमध्ये (Beed News) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रकाश शेंडगे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली.

राज्य सरकार हे ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. या मुद्द्यावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. राज्य सरकारकडून आम्हाला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही कोणत्याही बैठकीला जाणार नाही. जालन्यातली वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना प्रकाश शेंडगे यांनी म्हटले की, ओबीसी उपोषणाचा (OBC hunger strike) हा वणवा राज्यभरात पेटेल. ओबीसी आरक्षणावरुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारची असेल, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

लक्ष्मण हाकेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याशी फोनवर संवाद साधला. प्रकाश शेंडगे जालन्यातील उपोषणस्थळी आले असताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यावेळी लक्ष्मण हाके आणि मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यात संवाद झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांना ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही याची ग्वाही दिली. मात्र, आपल्याला याबाबत लेखी आश्वासन द्यावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली. आता ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का, हे पाहावे लागेल. तसे घडल्यास मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील हे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

राज्य सरकार ओबीसींना दुय्यम वागणूक देतं, लक्ष्मण हाकेंचा आरोप

राज्य सरकार ओबीसी समाजाला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी नुकताच केला होता. राज्यात आता कुठे छोट्या छोट्या घटकांना प्रतिनिधित्व भेटत आहे. त्यांच्या हक्काचे आरक्षण संरक्षित करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय. शासन पोलिसांच्या मदतीने आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी समाजाकडून यापूर्वी तीन आंदोलन करण्यात आली. मात्र, शासनाने याची साधी दखल देखील घेतली नाही, याचे आम्हाला दुःख असून शासन ओबीसींना दुय्यम वागणूक देते. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा लक्ष्मण हाके यांनी घेतला.

आणखी वाचा

आम्हाला नोटिस दिली तशीच जरांगे पाटील यांना दिली का? ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल, म्हणाले...

from Coastal Road Rolls-Royce Owner : फडणवीस, शिंदे, दादांनी वापरलेल्या रोल्स रॉयसचा मालक कोण? https://ift.tt/UIpVrb5
OBC Reservation: सगेसोयरेचा जीआर काढलात, ओबीसी आरक्षणाला विरोध केलात तर विधानसभा निवडणुकीत पाडू; प्रकाश शेंडगेंचा इशारा
June 15, 2024
0