Vijay Shivtare Talked About His Childhood: पुणे : लहानपणी फार मस्तीखोर, बंडखोर होतो, पण अभ्यास न करता देखील शाळेत हुशार होतो. तर चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा माजी मंत्री विजय शिवातरे (Vijay Shivtare) यांनी सासवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात केला आहे. सासवड (Saswad) येथील विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना शिवतारेंनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना बिड्या पित असल्याचा खळबळजनक खुलासा विजय शिवातरे यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना केला आहे. चौथीत असताना जनावरं वळायला जायचो, त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की, चक्कर येऊन पडायचो, असा खुलासा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवातरे यांनी सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (22 जून 2024) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यातच शिवतारेंचं वक्तव्य

विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलतानाच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हा खळबळजनक खुलासा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विजय शिवातरे यांनी सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी (22 जून 2024) गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचं विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले विजय शिवतारे?

माजी मंत्री विजय शिवतारे म्हणाले की, "लहानपणी मी खूप वांड होतो. प्रचंड बंडखोर... प्रचंड... म्हणजे, चौथीत बिड्या प्यायचो मी, तुम्हाला कुणाला विश्वास बसेल का? गुरं वळायला जायचं, गुरं सोडायची... चालत हरकुळला जायचं... आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे, बीडीचा बंडल आणायचा. दोन-चार बिड्या प्यायलो की, चक्कर येऊन पडायचो. असा बंडखोर प्रवृत्तीचा मी होतो. पण एक होतं... तरीदेखील मी पहिल्या क्रमांकावर होतो. मी कधीही अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आताही शाळेत गेलात, तर माझं नाव आहे तिथे. माझा हजेरी क्रमांकही असा होता ना... एक दिवस मी डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो. जो हजेरी क्रमांक कधीही बदलत नाही."

लोकसभेत बारामतीत शिवतारेंनी वाढवलेलं अजितदादांचं टेन्शन

बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत रंगली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंनी निवडणूक लढवली. हायव्होल्टेज लढतीत सुप्रिया सुळेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. पण, ही निवडणूक सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवार आणि शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची होती. पण या निवडणुकीत काही काळासाठी अजित पवारांची भलतीच तारांबळ उडाली होती. बारामतीतील राजकीय समीकरण जुळवून आणण्यासाठी अजित पवारांची तारांबळ उडाली असून, महादेव जानकर यांना रोखल्यानंतर अजित पवारांचे कट्टर राजकीय वैरी बनलेल्या विजय शिवतारेंनी बारामती निवडणूक लढवण्याचा चंग बांधला होता. पण अजित पवारांनी सर्व गणितं जुळवून शिवतारेंसोबत तह केला आणि शिवतारेंनी बारामती लोकसभेतून माघार घेतली.

पाहा व्हिडीओ : Vijay Shivtare Pune : मी चौथीत असताना बिड्या प्यायचो, चक्कर येऊन पडायचो : शिवतारे

from Pune Crime Special Report : पुण्यात दीड महिन्यात कोयता गँगचा 8 ठिकाणी हैदोस https://ift.tt/3omWhSQ
मी फार वांड, प्रचंड बंडखोर होतो; चौथीत बीड्या प्यायचो; गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात विजय शिवतारे यांनी सांगितला बालपणीचा 'तो' किस्सा
June 22, 2024
0