Maharashtra Board HSC Result : पुणे : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) आज (21 मे 2024) जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC/12th) निकालासाठी अधिसूचना जारी करून निकाल जाहीर केला आहे. अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे. यानंतर, विद्यार्थी अधिकृत वेबसाईट <a href="https://ift.tt/bu2IJtj> वर जाऊन गुणपत्रिकेची एक प्रत डाऊनलोड करून निकाल पाहू शकतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12th Exam) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार उद्या दुपारी जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC Exams) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवारी 21 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 
कुठे पाहता येणार निकाल? 
15 लाख विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा
राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. 
दरम्यान, बारावीचा निकाल आज उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत संबंधित महाविद्यालयांमध्ये काही दिवसानंतर उपलब्ध होईल. त्यानंतर विद्यार्थी पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी त्याचा वापर करु शकतात. सीबीएसईनं यापूर्वीच दहावी आणि बारावीचा निकाल एकाच दिवशी जाहीर केला आहे. 
from Zero Hour Lok Sabha Elections : पवार, ठाकरे, मोदी ते शिंदे; निवडणूक कुणासाठी सर्वाधिक महत्वाची? https://ift.tt/8hbzu4q
Maharashtra HSC Result: ऑल द बेस्ट! पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली; बारावीचा निकाल आज जाहीर होणार
May 20, 2024
0