<p>Pune Accident : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईची...पोलिसांच्या या कारवाईनंतर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे समोर आलंय...अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय...त्यात ससून रुग्णालयातले डॉ. अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा समावेश आहे...याप्रकरणात ससून रुग्णालयाचा शिपाई अमित घटकांबळे यालाही अटक करण्यात आलीय.. घटकांबळे याच्याच माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे..या तिन्ही आरोपींनी ३० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय..दरम्यान अतुल घटकांबळे याच्याकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५० हजार रुपये जप्त केलेत. तर डॉ श्रीहरी हळनोर यांच्याकडून २.५ लाख रुपये जप्त करण्यात आलेत. आता ही रक्कम कोणी घटकांबळे याला दिली याचा शोध सुरू आहे.</p>
from ABP Majha Headlines : 10 PM : 27 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/IXGKp98
यंदा धो-धो बरसणार! राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता, देशभरात सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज
May 27, 2024
0