Ads Area

13 January In History: अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म, मदन पुरी, प्रभाकर पणशीकर यांचे निधन; आज इतिहासात

मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा आणि अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आहे. मिकी माऊस चित्राच्या रुपात आले होतं तर आजच्याच दिवशी भारतात पोलिओचा अखेरचा रुग्ण आढळला होता.  हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन निधन झाले होते. त्याचप्रमाणे ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले. अभिनेता इम्रान खानचा 13 जानेवारी 1983 साली जन्म झाला होता.

1915: इटलीतील अवेझानो भूकंप, तीस हजार जणांचा मृत्यू (Avezzano earthquake)

इटलीतील अवेझानो येथे १३ जानेवारी रोजी सकाळी सात वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. जवळपास सात रेश्टर स्केलच्या या भूकंपामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. या भूकंपामध्ये जवळपास तीस हजार जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल ६० मिलिअन डॉलरचं नुकसान झालं होतं. या भूकंपामुळे अनेकजण रस्त्यावर आली होती. कुणी आई, तर कुणी बापाला गमावलं होतं. तर कुणाचा मुलगा तर कुणीची मुलगी मृत झाली होती. या भूकंपाच्या आठवणी आजही इटलीतील लोकांसाठी ताज्या असतील.

1930 : मिकी माऊस चित्राच्या रुपात (Mickey Mouse)

मिकी माऊस हा प्रथम चित्र रुपात आणि कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आजच्याच दिवशी १९३० मध्ये आला होता. सशापासून उंदरापर्यंत वाल्ट डिस्ने यांनी पहिले ओसवॉल्ड सशाचे पात्र रंगवले होते. परंतु युनिव्हर्सल स्टुडिओने त्यांच्याकडून हे पात्र हिसकावून घेतले. तेव्हा वॉल्टने मिकी माऊस तयार केला. १९३० मध्ये हे पात्र प्रथम चित्र रुपात लोकांच्या समोर आलं. आजही मिकी माऊस अबालवृद्धांची मने रिझवत आहे.

1938:  पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म (Pandit Shivkumar Sharma)

जागतिक कीर्तीचे प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचा आजच्याच दिवशी म्हणजे १३ जानेवारी १९३८ मध्ये जन्म झाला होता. संतूर वाद्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रतिष्ठा मिळवून देणारे अशी पंडित शिवकुमार यांची ओळख आहे. 10 मे 2022 रोजी हार्ट अॅटकच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंडित शिवकुमार शर्मा  यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेय. १९८६ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री तर 2001 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं.  शास्त्रीय संगीतावर आधारित अल्बम 'कॉल ऑफ द व्हॅली', रोमँटिक ड्रामा फिल्म 'सिलसिला' आणि 'चांदनी'साठी त्यांना 'प्लॅटिनम डिस्क' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1985 मध्ये त्यांना अमेरिकेतील बाल्टिमोर शहराचे मानद नागरिकत्व बहाल करण्यात आलेय.

1949 : राकेश शर्मा यांचा जन्म (Rakesh Sharma)

भारताच्या अवकाश संशोधनाचा विषय निघाला की,  कल्पना चावला आणि राकेश शर्मा यांची नावं हमखास निघतात. राकेश शर्मा अंतरिक्षात जाणारे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. त्यांचा आजच्याच दिवशी 1949 मध्ये जन्म झाला आहे.  2 एप्रिल 1984 रोजी राकेश शर्मा यांनी Soyuz T-11 मोहिमेअंतर्गत अवकाशयानामधून Salyut 7 स्पेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली होती. यासह ते भारताचे पहिले तर जगातील अंतराळवीर ठरले.

1966 : मुंबई-पुणे शताब्दी एक्सप्रेस (Mumbai–Pune Shatabdi Express)

आजच्याच दिवशी १९६६ मध्ये मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस सुरू झाली होती. प्रवासी कमी असल्यामुळे 2006 मध्ये ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याजागी मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी गाडी सुरु करण्यात आली. शताब्दी एक्सप्रेस संपूर्ण वातानुकूलीत होती. त्यामुळे प्रवाशांची संख्या खूप कमी होती. परिणामी ही गाडी बंद करण्यात आली.  या गाडीच्या जागी आज मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस धावते.

1985 : हिंदी चित्रपटातील अभिनेता मदन पुरी यांचे निधन

मदन पुरी हे हिंदी आणि पंजाबी चित्रपटांचे भारतीय अभिनेते होते . अभिनेता चमन पुरी आणि अमरीश पुरी हे त्यांचे भाऊ . मुख्यत: नकारात्मक भूमिकांमध्ये (खलनायक) चरित्र अभिनेता म्हणून, त्यांनी पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळच्या कारकिर्दीत सुमारे 430 चित्रपटांमध्ये काम केले. मदन लाल पुरी यांचा जन्म पंजाबमधील नवांशहर येथे एका पंजाबी हिंदू कुटुंबात निहाल चंद पुरी आणि वेद कौर यांच्या घरी झाला. राहोनमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. मोठा भाऊ चमन पुरी , धाकटा भाऊ अमरीश पुरी आणि हरीश लाल पुरी आणि धाकटी बहीण चंद्रकांता मेहरा यांच्यासह ते पाच मुलांपैकी दुसरे होते . ते गायन सनसनाटी कुंदन लाल सहगल यांचे चुलत भाऊ होते .

1960 च्या उत्तरार्धात आणि 1970 च्या सुरुवातीच्या काळात पुरी हे भारतीय चित्रपट उद्योगातील एक प्रमुख कलाकार होते. ते गायक केएल सैगल यांचे पहिले चुलत भाऊ होते , ज्यांच्या मदतीने त्यांनी बॉलिवूडमध्ये ठसा उमटवण्यास सुरुवात केली. एकदा पुरी हा एक प्रस्थापित स्टार होता, त्याने त्याचा भाऊ अमरीश पुरी यांच्यासाठीही असेच केले , त्याला चित्रपट जगतात स्वत:ची स्थापना करण्यात मदत केली. पुरी यांची अभिनय कारकीर्द 1940 ते 1980 च्या दशकाच्या मध्यापर्यंत 40 वर्षांपेक्षा जास्त काळ होती. तो 430 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसला. 1946 मध्ये अहिंसा या नावाने त्यांचा चित्रपट पदार्पण करण्यात आला . मदनने खलनायक आणि नकारात्मक पात्रे आणि नायक किंवा नायिकेचे काका, वडील किंवा मोठा भाऊ, आजोबा, पोलीस अधिकारी आणि राजकारणी यांच्या भूमिका करून वर्षाला सरासरी आठ चित्रपट केले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत जट्टी , जट्ट पंजाबी आणि अशा अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.

1985 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले . ते कपूरांसह त्या काळातील इतर अभिनेत्यांसह मुंबईतील माटुंगा येथील आरपी मसानी रोडचे रहिवासी होते , ज्याला पंजाबी गल्ली असेही म्हणतात. त्यांच्या मृत्यूनंतर 1989 पर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले ज्यात त्यांचा अंतिम चित्रपट संतोष होता .

भारतातील पोलिओचा शेवटचा रुग्ण  (india last polio case)

आजच्याच दिवशी म्हणजे, 13 जानेवारी, 2011 रोजी हावडा येथे देशातला शेवटचा पोलिओ रूग्ण सापडल्याची नोंद आहे. जगभरातील पोलिओ रुग्णांपैकी  भारतामध्ये पोलिओचे 60 टक्के रुग्ण होते. पण केंद्र सरकारने देशभरात पोलिओसाठी अभियान राबवलं.. त्यासह अनेक योजनाही आणल्या.. परिणाम देशातून पोलिओ हद्दपार झाला... आजही देशभरात बाळाला पोलिओचा डोस दिला जातो.

पश्चिम बंगालमध्ये दंगल, 100 जणांचा मृत्यू

आजच्याच दिवशी 1664 मध्ये पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये दोन समाजामध्ये दंगल झाली होती. या दंगलीमध्ये शंभर जणांचा मृत्यू झाला होता तर चारशे जण जखमी झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल सातशे जणांना अटक केलं होतं. तर तब्बल ५५ हजार जण लष्कराच्या शिबिरात वास्तव्यास होते.

इतर महत्वाच्या घडामोडी

1559: एलिझाबेथ यांची पहिल्या इंग्लंडच्या राणीपदी नियुक्ती
1610:  प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ गॅलिलियो यांनी गुरूचा चौथा उपग्रह कॅलिस्टो याचा शोध लावला.
1899: गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग झाला
1942: जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेनं कारगृहात पाठवायला सुरूवात केली.
1983: भारतीय अभिनेते इम्रान खान यांचा जन्म
2007: के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे 37 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.

from PM Narendra Modi : रस्सीखेचीच्या चर्चा मोदींनी संपवल्या; 'हम सब एक है'चा नारा https://ift.tt/CryN7SI

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area