मुंबई : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतीय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा तसेच ह्यूमन काॅम्पूटर अशी ओळख असलेल्या शकुंतला देवी जन्म आजच्या दिवशी झाला होता. इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे. पुण्यात डेक्कन सभेची स्थापना आजच्या दिवशी झाली होती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने आजच्याच दिवशी घटनेचा मसुदा सादर केला होता.आजच्याच दिवशी बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. तसेच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

1845 : वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म

भारतीय क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, रायगडमध्ये 4 नोव्हेंबर 1845 साली झाला. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली होती. एका लढाईनंतर ब्रिटीश सरकारने फडके यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. 1879 साली विजापूर जवळील देवर नावडगी या गावाच्या बाहेर एका बौद्ध विहारामध्ये गाढ झोपेत असताना त्यांना अटक करण्यात आले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तिथं मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी आमरण उपोषण केले आणि त्यांचा 17 फेब्रुवारी 1883 रोजी मृत्यू झाला.

1896 : पुण्यात डेक्कन सभेची स्थापना

भारतातील उदारमतवादी, समाजसुधारक, धर्मसुधारक, राजनीतिज्ञ, अर्थसास्त्रज्ञ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी 1896 साली पुण्यात ‘डेक्कन सभा’ ही नवी संस्था काढली. रानडे यांनी 1870 मध्ये स्थापलेल्या पुण्यातील ‘सार्वजनिक सभा’ या संस्थेमध्ये फाटाफूट झाली आणि दोन गट पडले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे सहकारी यांनी आपले बहुमत स्थापित करून न्यायमूर्ती रानडेंच्या अनुयायांना दूर केले होते.

1939 : शकुंतला देवी यांचा जन्म

ह्यूमन काॅम्पूटर अशी ओळख असलेल्या शकुंतला देवी यांचा 4 नोव्हेंबर 1929 रोजी झाला होता. शकुंतलादेवी यांच्या अंगी एक अद्भुत प्रतिभा होती की अख्ख्या भारतास त्याची दाखल घ्यावी लागली . गुगलने त्यांच्या पहिल्या जयंतनिमित्त डुडल बनवून त्यांना आदरांजली वाहिली होती. 2013 साली एप्रिल महिन्यात वयाच्या 83 व्या वर्षी बंगलोरमध्ये शकुंतला देवी यांनी अखेरचा श्वास घेतला.

1948: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असलं तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 4 नोव्हेंबर 1948. पण हा अंतिम मसुदा नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असणाऱ्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला. त्यानंतर 2 वर्षं, 11 महिने आणि 18 दिवसांच्या परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर रोजी राज्य घटनेचा मसुदा तयार झाला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली

2008 : बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

आजच्याच दिवशी बराक ओबामा हे 2008 साली अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅककेन यांचा 365 विरुद्ध 165 मतांनी पराभव केला.

इतर महत्त्वाच्या घटना

1918 : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली.
1921 : जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या.
1922 : तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश.
1972 : अभिनेत्री तब्बूचा जन्म
1996 : कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा नाट्यगौरव पुरस्कार डॉ. श्रीराम लागू आणि सत्यदेव दुबे यांना जाहीर
1998 : हिंदी कवी नागार्जुन यांचा जन्म
2000 : हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार जाहीर.
2001: हॅरी पॉटर अॅण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.

from Elvish Yadav : एल्विश यादव कोण? एल्विश यादवची 'लॅव्हीश' राहणी https://ift.tt/hu9FYdw
04 November In History : वासुदेव बळवंत फडके आणि शकुंतला देवी यांचा जन्म, बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; आज इतिहासात
November 03, 2023
0