<a href="https://ift.tt/Q0lVIO1 Update : राज्यासह देशात गेले काही दिवस पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास (Return Monsoon) सुरु झाला असला तरी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही महाराष्ट्रात जोरदार पाऊस (Maharashtra Weather Update) पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस

गणेशोत्सवापासून राज्यात पावसाची रिमझिम कायम आहे. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू केरळ राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुंबईत ढगाळ वातावरण

भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की मुंबई आणि आसपासच्या परिसरात आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल. या आठवड्यात मुंबई शहरासह उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत. मुंबईत येत्या काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. या वर्षी मान्सूनचे आगमन होऊनही मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत जून ते सप्टेंबर दरम्यान 13 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

Conditions for withdrawal of Southwest Monsoon from Jammu and Kashmir region, Himachal Pradesh, Uttarakhand, West Uttar Pradesh, West Madhya Pradesh remaining parts of Gujarat, East Uttar Pradesh, Madhya Pradesh and Maharashtra during next 2-3 days are becoming favourable. pic.twitter.com/aI3soptBbz
— India Meteorological Department (@Indiametdept) October 3, 2023

पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघार घेणार

नैऋत्य मान्सूनने 3 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर भारतातील बहुतांश भागांतून माघार घेतली आहे. उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि गुजरातमधील उर्वरित भागांमधूनही मान्सून माघारी परतला आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, उर्वरित गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून पुढील दोन-तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती आहे.

from maharashtra https://ift.tt/IYj9q8H
Weather Update : परतीच्या पावसाचा धुमाकूळ! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस! कोल्हापूरला ऑरेंज, तर पुण्यात येलो अलर्ट
October 03, 2023
0
Tags