<div dir="auto" style="text-align: justify;">Shahapur Bus Accident : दसरा मेळावा आटोपून आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा भीषण अपघात झाला आहे. दसरा मेळाव्यानंतर आपापल्या गावी परतणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांचा <a title="मुंबई" href="https://ift.tt/3yKuqp4" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a>-आग्रा महामार्गावर शहापूर जवळ विचित्र असा भीषण अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारासची ही घटना असून यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाल्याचं बघायला मिळत आहे. एक ट्रक आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड - सोयगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते प्रवास करत असलेल्या परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अपघात झाला. त्यानंतर मागून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या इतर दोन बसेसही एकमेकांवर धडकल्या. यात ट्रक आणि एक बस थेट उड्डाणपुलावरील साईड डिव्हायडर तोडून उड्डाणपुलाखालील रस्त्यावर कोसळल्या तर, इतर दोन बसचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रस्त्यावर काचांचा खच पडला आहे. या विचित्र अपघातात 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून काहींना गंभीर इजाही पोहोचली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य आणि वाहने हटवण्याचे काम केलं जातं आहे.</div>
from CM Eknath Shinde Dasara Full Speech : निर्लज्ज ते महागद्दार, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर थेट वार https://ift.tt/UVQC7wT
Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्यांनंतर गावी परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भीषण अपघात, तीन बस आणि ट्रकची टक्कर
October 24, 2023
0
Tags