22 October In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 22 ऑक्टोबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. भारतासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारतीय क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांची जयंती आहे. काकोरी कटात त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. ब्रिटिशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आजच्या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भाक्रानांगल या धरणाचे लोकार्पण केले. तर,भारताकडून पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण आजच्या दिवशी झाले. ही मोहीम भारतीय अंतराळ मोहिमांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची होती.

1900 : क्रांतिकारक अशफ़ाक उल्ला खान यांचा जन्म

आज भारतीय क्रांतिकारक अशफ़ाक उल्ला खान यांचा आज जन्मदिन आहे. अश्फ़ाक उल्ला खान हे भारतीय स्वातंत्र्य संग्रांमातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांनी काकोरी कांडमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर खटला चालवला आणि 19 डिसेंबर सन 1927 ला त्यांना फैजाबाद जेलमध्ये फासावर लटकावण्यात आले. राम प्रसाद बिस्मिल प्रमाणेच अशफ़ाक उल्ला खान हे उर्दू भाषेचे चांगले कवी होते.

1938 : जगातील पहिले झेरॉक्स मशीन तयार

चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशीन तयार केले. 8 फेब्रुवारी 1906 रोजी जन्मलेले चेस्टर फ्लॉइड कार्लसन. एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक होते. कार्लसनने इलेक्ट्रोफोटोग्राफीचा शोध लावला, ही प्रक्रिया जगभरातील लाखो फोटोकॉपीर्सद्वारे वापरली जाते. कार्लसनच्या शोधामुळे फोटोस्टॅट प्रक्रियेद्वारे तयार केलेल्या ओल्या प्रतींच्या उलट प्रत तयार केली गेली. कार्लसनच्या प्रक्रियेला झेरोग्राफी असे नाव देण्यात आले. 19 सप्टेंबर 1968 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 22 ऑक्टोबर 1938 रोजी, पहिल्या मायक्रोस्कोप स्लाइडची कॉपी केल्याच्या दहा वर्षानंतर हॅलॉइड कंपनीने झेरोग्राफीची पहिली सार्वजनिक घोषणा केली.

1963 : भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण

पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले. 1958-59 मध्ये भाक्रा धरणातून कालव्यांद्वारे पंजाब आणि राजस्थान राज्यांच्या काही भागास पाणीपुरवठा होऊ लागला. हा 236 कोटी रुपये खर्चाचा संपूर्ण प्रकल्प 1963 मध्ये पूर्ण होऊन 22 ऑक्टोबर 1963 रोजी पंडित नेहरुंच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

ऑक्टोबर 1963 मध्ये, भाक्रा-नांगल प्रकल्पाच्या राष्ट्राला समर्पण केल्याच्या समारंभात पंतप्रधान नेहरू म्हणाले, "हे धरण मानवजातीच्या हितासाठी माणसाच्या अथक परिश्रमाने बांधले गेले आहे आणि म्हणूनच ते पूजेस पात्र आहे. तुम्ही याला मंदिर म्हणा किंवा गुरुद्वारा किंवा मशीद म्हणा, ते आमच्या कौतुक आणि आदराची प्रेरणा देते."

नांगल धरण हे भाक्रा धरणाच्या खाली पंजाबमधील दुसरे धरण आहे. सतलज नदीवर वसलेल्या, भाक्रा नांगल धरणाची उंची 741 फूट (226 मीटर) आहे. ज्यामुळे ते जगातील सर्वोच्च गुरुत्वाकर्षण धरणांपैकी एक आहे. गोविंदसागर जलाशय, ज्याला गुरु गोविंद सिंग यांचे नाव देण्यात आले आहे. भाक्रा-नांगल धरणाचा प्राथमिक वापर म्हणजे सिंचन, पावसाचे पाणी साठवणे. सतलज नदीवर असलेले भाकरा धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशला पाणी पुरवठा करते. याच धरणाचे पाणी वापरून दिल्ली, चंदिगडसह उत्तर भारतातील बऱ्याच मोठ्या भूप्रदेशाला वीज पुरवठा केला जातो.

1978 : नारायण सीताराम फडके यांचे निधन

नारायण सीताराम फडके यांचा मृत्यू. ना.सी. फडके हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते. ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.1949 मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडके यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा आणि डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत.

2008 : भारताकडून पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण

भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-1 चे प्रक्षेपण केले. चंद्रयान 1 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान. चंद्रयान 1 हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण 22 ऑक्टोबर 2088 रोजी रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर 8 रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले.

इतर महत्त्वाच्या घटना

1933: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचा मृत्यू
1942: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह यांचा जन्म
1988 : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा वाढदिवस.
1998: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन
2000: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन
2014 : भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन

from Nirbhaya Mother : कोपर्डीजवळ येऊनही Jarange यांनी विचारपूस केली नाही- निर्भयाची आई https://ift.tt/uQok7j1
22 October In History : भाक्रा धरण देशाला अर्पण, जगातील पहिले झेरॉक्स मशीन तयार, पहिल्या चांद्रयान मोहिमेचे प्रक्षेपण; आज इतिहासात...
October 21, 2023
0