मुंबई : इतिहासात 15 ऑक्टोबर रोजी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. तर आजच्याच दिवशी गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली. कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा देखील आजच्या दिवशी जन्म झाला. टाटा एअरलाइन्सचे पहिल्या विमानाने आजच्याच दिवशी उड्डाण केले. 15 ऑक्टोबर 1993 मध्ये नेल्सन मंडेला यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन झाले.

1888: आगरकरांनी सुधारक पत्राची केली सुरुवात

सुधारक हे भारतातील एक वृत्तपत्र होते. त्याची स्थापना 1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी केली होती. ज्यांनी यापूर्वी केसरीचे संपादन केले होते. वृत्तपत्र हे अँग्लो- मराठी भाषेत होते. ते महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात प्रकाशित होत होते. सुधारकचा पहिला अंक दसऱ्याच्या मुहूर्तावर बाहेर पडला. आगरकरांच्या मतांशी कोणीही सहमत नसल्याने सुधारक पत्र काढताना कोणी सहकारी त्यांच्यासोबत आला नाही. यामुळे आगरकरांनी गोखले यांना सहकारी करून आपले पत्र सुरू केले.सुधरक पत्रात इंग्रजी मजकूरही देण्याचा निर्णय आगरकरांनी घेतला होता. आपले म्हणणे सरळ सरकारपुढे ताबडतोब जावयाचे तर ते इंग्रीजीतून प्रसिद्ध करणे आवश्क असल्याने इंग्रजी मजकूरही पत्रात घालण्याचे ठरविण्यात आले. मराठी व इंग्रजी अशी दोन स्वतंत्र पत्रे सुरू करणे आगरकरांना अर्थातच शक्य नव्हते म्हणून एकाच पत्रात दोन्ही भाषांतील मजकूर देण्याचा गंगाजमनी मार्ग पत्करला लागला.

1926 : कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्म

मुंबईतील चिंचपोकळीतील एका कापडगिरणीसमोर रस्त्यावरचा एक अनाथ जीव गंगाराम सुर्वे या मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये साचेवाला म्हणून काम मरणाऱ्या गिरणी कामगाराने उचलून घरात आणला.त्याच गिरणीत बाईंडिंग खात्यात काम करणाऱ्या गिरणी कामगार काशीबाई सुर्वे यांनी या "बाळगलेल्या पोराला' स्वतःच्या मुलासारखे प्रेम दिले आणि "नारायण गंगाराम सुर्वे' हे नावही दिले. परळच्या बोगद्याच्या चाळीत ते वाढले. कमालीचे दारिद्ऱ्य, अपरंपार काबाडकष्ट आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष यांतून नारायण सुर्वे यांचे आयुष्य चांगलेच शेकून निघाले.त्यांची पहिली कविता 1958 मध्ये "नवयुग' मासिकात प्रसिद्ध झाली. "डोंगरी शेत माझं गं....' हे त्यांचे पहिले गाजलेले गीत. एचएमव्हीने त्याची ध्वनिफीत काढली. इ.स. 1962 साली त्यांनी लिहिलेल्या कवितांचा पहिला संग्रह - "ऐसा गा मी ब्रह्म" - प्रकाशित झाला.त्याला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सुर्वे यांचे कवितासंग्रह एकामागोमाग येत राहिले आणि गाजले सुद्धा.

"माझे विद्यापीठ', "जाहीरनामा', "पुन्हा एकदा कविता', "सनद' हे त्यांचे कवितासंग्रह. नालबंदवाला याकूब, चंद्रा नायकीण, दाऊद शिगवाला, हणम्या, इस ल्या, पोटाची खळगी भरण्यासाठी सह्याद्रीचा कडा उतरून मुंबईत कामधंद्याच्या शोधात आलेल्या व समुद्राच्या तीरावर झुंजत मरण पावलेल्या एका कष्टकरी मुलाचा बाप, आपल्या तारुण्यातील पराक्रम मुलाला ऐकविणारा वृद्ध पिता, गोदीवर काम करणारा आफ्रिकन चाचा, पंडित नेहरूंचे निधन झाले म्हणून धंदा बंद ठेवणारी सुंद्री वेश्या , अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी अत्यंत समर्पकपणे व रेखीवपणे उभी केली आहेत. सुर्व्यांचे पहिलेवहिले काव्यवाचन झाले ते कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली मडगावच्या साहित्य संमेलनात. त्या वेळेपासून ते प्रत्येक काव्यमैफलीत खड्या सुराने रंग भरत आहेत. "मास्तर, तुमचंच नाव लिवा...', "असं पत्रात लिवा', "मर्ढेकर', "सर कर एकेक गड', "मनिऑर्डर', "मुंबईची लावणी', "गिरणीची लावणी' या त्यांच्या कविता हमखास पावती घेतात. साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी यांना इ.स. 1998 चा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला.नारायण सुर्वे यांच्यावरती मार्क्सवादी विचाराचा पगडा होता ,आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली आहेत.

1931 मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचा जन्म

अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती, कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे. डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तीशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे. अब्दुल कलाम तरुणांना देशाची खरी ताकत मानत होते. अब्दुल कलाम यांचा प्रवास तरुणांना नेहमीच प्रेरणा देणारा राहिलाय. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो. भारत सरकारने अब्दुल कलाम यांना 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' व 1997 मध्ये 'भारतरत्‍न' हा सर्वोच्च किताब देऊन सन्मान केलाय. 15 ऑक्टोबर रोजी 100 वर्षांपूर्वी शिर्डीमध्ये साईबाबांनी समाधी घेतली होती.

1932 : टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण

टाटा एअरलाइन्सचे पहिले उड्डाण झाले. जे. आर. डी. टाटा यांनी हे विमान कराचीहुन मुंबई येथे आणले व नागरी विमानसेवेची सुरुवात केली. याच कंपनीचे पुढे राष्ट्रीयीकरण होऊन एअर इंडिया ही कंपनी अस्तित्त्वात आली.

1993: नेल्सन मंडेला यांना शांततेचा नोबेल पुरस्कार

मानवाधिकार कार्यकर्ते, वकील आणि शांततेचे आंतरराष्ट्रीय प्रवर्तक, नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा जन्म 18 जुलै 1918 मध्ये झाला. सामाजिक समतेच्या मूल्यांसाठी त्यांनी आयुष्यभर दिलेल्या लढ्यामुळे मंडेला हे जगभरात वर्णभेदविरोधी संघर्षाचे प्रतिक म्हणून ओळखले जातात. दक्षिण अफ्रिकेतील वर्णभेदी राजवटींविरुद्ध त्यांनी कडवा संघर्ष केला होता. या लढ्यामुळे त्यांना आपल्या आयुष्याची तब्बल 27 वर्ष तुरुंगात काढावी लागली. मात्र, या लढाईत अखेर त्यांचाच विजय झाला. त्यानंतर लोकशाही मार्गाने ते दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्षही झाले. दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनण्याचा मान नेल्सन मंडेला यांना मिळाला. ‘लाँग वॉक फॉर फ्रीडम’ हे नेल्सन मंडेला यांचं आत्मचरित्र जगभर गाजलं. त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवादही प्रकाशित झाले. त्यांची छोटी-मोठी चरित्रंही आजवर प्रकाशित झाली. नेल्सन मंडेला यांना ऑक्टोबर 1993 मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .

2002 : प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार ना. सं. इनामदार यांचे निधन.

नागनाथ संतराम इनामदार हे मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ कादंबरीकार होते. इतिहासकाळातील पात्रांना विशेष करुन उपेक्षित पात्रांना न्याय देणारी त्यांची भूमिका होती. त्यामुळे हीच त्यांची ओळख मराठी वाचला कायम राहिल. इतिहासाचा विपर्यास होऊ नये यासाठी कसून संशोधन, इतिहासाचे सजर्नशील आकलन, आणि प्रसंगातील नाटयमयता आणि चित्रदर्शी शैली यामुळे त्यांच्या कादंबऱ्या या कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. 1857 च्या स्वातंत्र्यसमरावर लिहीलेली 'बंड' ही त्यांची पहिली कादंबरी आहे. परंतु ती प्रसिध्द होण्यास मात्र 1996 साल उजाडले. त्या समराच्या शताब्दीच्या निमित्ताने त्यांनी ती लिहीली होती. . ज्या काळात वाढते औद्योगिकीकरण, दाबले गेलेले कामगार, बदलणारे सामाजिक आणि व्यक्तिगत वास्तव यांचे पडसाद मराठी साहित्यसृष्टित उमटत होते, त्या काळात आपली आगळी वेगळी शैली घेऊन ना. सं. इनामदार आले आणि त्यांनी मराठी वाचकांना अक्षरश: जिंकून घेतले.

औरंगाजेबावर त्यांनी लिहीलेली त्यांची शेहनशाह ही कांदबरी मात्र वादाचा विषय देखील ठरली होती. तरीही प्रचलित विचारसरणी सोडून त्यांनी त्यांच्या या कांदंबरीमध्ये औरंगजेबाचं चरित्र रेखाटलं आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या या कांदंबरीवर आक्षेप घेतला. अशा या महान कादंबरीकाराचं 16 ऑक्टोबर 2002 रोजी निधन झालं.

2002 : लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन

वसंत सबनीस हे मराठी साहित्यिक, नाटककार होते. लेखक, विनोदी नाटककार, ग्रामीण कथेला विनोदी बाज देणारे कथाकार आणि पटकथालेखक म्हणून वसंत सबनीस महाराष्ट्रात गाजले. त्यांचे मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस होते. चिल्लरखुर्दा (1960), भारूड (1962), मिरवणूक (1965),पंगत (1978) , आमची मेली पुरुषाची जात (2001) हे त्यांचे प्रसिद्ध लेखसंग्रह आहेत. त्यांच्या कथांवरून 'एकटा जीव सदाशिव', 'सोंगाड्या' हे दादा कोंडकेनिर्मित चित्रपट बनले.'अशी ही बनवाबनवी','एकापॆक्षा एक', गंमत जंमत', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' ह्या सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटांच्या कथा-पटकथा सबनीसांच्या होत्या. पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून वसंत सबनीस 1942 साली मॅट्रिक झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून 1946 साली बी.ए. झाल्यावर सबनीसांनी आयुष्यभर सरकारी नोकरी केली. नोकरी सांभाळून त्यांनी काव्यलेखनाने मराठी साहित्याच्या सेवेचा आरंभ केला. पुढे ते ललित आणि विनोदी लेखनाकडे वळले.

इतर महत्त्वाच्या घटना

1789 : उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश रामचंद्र विश्वनाथ तथा रामशास्त्री प्रभुणे यांचे निधन.
1542 : तिसरा मुघल सम्राट बादशाह अकबरचा जन्म
1868 : हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान
1896 : स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती सेठ गोविंद दास यांचा जन्म.
1973 : हेन्री किसिंजर आणि ली डक यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर.

from maharashtra https://ift.tt/E4CyMZG
15 October In History : कवी नारायण सुर्वे यांचा जन्मदिन, मिसाईल मॅन अब्दुल कलाम यांचा जन्म; आज इतिहासात
October 14, 2023
0
Tags