Ads Area

Mumbai Toll News : आजपासून मुंबईकरांवर वाढीव टोलचा भुर्दंड; जाणून घ्या नवे दर

मुंबई:  मुंबईत प्रवेश करणाऱ्या एन्ट्री पॉईंटवरील टोल दरात आजपासून वाढ (Mumbai Toll Hike) झाली आहे. मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल महाग झाले आहेत. त्यामुळे मुंबईत प्रवेश करणे आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्यांना खिसा थोडा रिकामा करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी)  मुंबईतील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 27 सप्टेंबर 2002 च्या अधिसूचनेत दर तीन वर्षांनी टोल दरवाढीसंदर्भात उल्लेख केलेला आहे. त्यानुसार ही टोल दरवाढ केली जाणार आहे. या टोल दरवाढीवर याआधीच टीका झाली आहे. टोल दरवाढीचा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने या निर्णयावर टीका केली होती.

टोलचा नवा दर काय?

पूर्वी चार चाकी वाहनांसाठी 40 रुपये टोल होता. आता त्यात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. या पूर्वी मिनी बससाठी 65 रुपये, ट्रकसाठी 130 रुपये आणि अवजड वाहनासाठी 160 रुपये टोल द्यावा लागत होता.

- छोटी वाहने – 45 रुपये
- मध्यम अवजड वाहने – 75रुपये
- ट्रक आणि बसेस – 150 रुपये
- अवजड वाहने – 190 रुपये

मुंबईतील कोणत्या एन्ट्री पॉईंटवर टोल

मुंबईत सायन-पनवेल महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, एलबीएस मार्ग आणि ऐरोली उड्डाणपूल कॉरिडोअर या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल वसूल केला जातो. या पाचही टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी असते. वाहनांच्या रांगांमुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.

6000 कोटींचा फटका

पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोल माफ (Mumbai Entry Point Toll) करावे अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संजय शिरोडकर यांनी केली होती.  या टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळेचा अपव्यय होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रवेश करण्यासाठी अथवा बाहेर पडताना पाच एन्ट्री पॉईंट आहेत. या पाच एन्ट्री पॉईंटवर टोल माफी करण्याची मागणी मनसेकडून सातत्याने करण्यात येत आहे.

जुलै 2015 मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) पाहणी केली होती. त्यावेळी अहवाल तयार करण्यात आला होता.  यावेळी अहवालात टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीमुळे इंधन, वेळेचा अपव्यय, कामाच्या तासाचे होणारे नुकसान यामुळे साधारणपणे 6000 कोटींचे नुकसान होते. याचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बसत असल्याकडे संजय शिरोडकर यांनी म्हटले.

एमएसआरडीसीचा असा अहवाल असताना अजूनही टोल कसे सुरू आहेत, हे एक गौडबंगल असल्याचे त्यांनी म्हटले.  गलथान कारभार आणि लोकांना किती मनस्ताप होतो, हे सगळ्यांना माहीत आहे. वर्षाला 6000 कोटींचे नुकसान करणारे टोल नाके बंद झाले पाहिजे. अशी मागणीदेखील शिरोडकर यांनी केली.

from maharashtra https://ift.tt/Ex4pmCW

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area