Jalna Maratha Reservation agitation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन (Maratha Reservation agitation) करणाऱ्या जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जालना शहरातील अंबड चौफुली आणि इंदेवाडी भागामध्ये पोलीस (Police) आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादांचे रुपांतर दगडफेकीमध्ये झाले होते. यानंतर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. अंबड चौफुली भागात एक ट्रक जाळून चालक असलेला फिर्यादी आणि क्लिनरला डांबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जालना शहरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती दिली आहे. आरोपीवर गुन्हे दाखल केले असून, सर्वांनी शांतता राखण्याचा आवाहन त्यांनी केलं आहे.

पुन्हा जालन्यात दगडफेक आणि लाठीचार्ज

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीचार्जची केल्याची घटना घडली. यानंतर आंदोलकांनी दगडफेक केली. यामध्ये काही आंदोलकत आणि पोलीस जखमी झाल आहेत. यानतर राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. ठिकठिकाणी बंद पाळला जात आहे. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर कालपुन्हा जालन्यात दगडफेक आणि लाठीचार्जची घटना समोर आली आहे. ग्रामीण भागातील घटनेनंतर आता जालना शहरात देखील हे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झालेल्या झटापटीनंतर दगडफेक करण्यात आली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

आंदोलनाला हिंसक वळण

जालना येथील घटनेनंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तर बऱ्याच ठिकाणी वाहने देखील पेटवून देण्यात येत आहे. काही ठिकाणी रस्ते अडवून तयार पेटवून देण्याच्या घटना समोर येत आहे. त्यामुळे आंदोलकांनी हिंसा न करता शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच कोणेही कायदा हातात न घेता हिसंक घटना करु नयेत असेही पोलिसांकडून सतत सांगण्यात येत आहे. तसेच पोलिसांचे परिस्थितीवर लक्ष असून, कोणेही अफवा पसरवू नयेत असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. तसेच ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

जालना शहरात पुन्हा दगडफेक आणि लाठीचार्ज, ग्रामीण भागातील लोण आता शहरातही; पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन

from maharashtra https://ift.tt/toQxOu1
Jalna Maratha Reservation agitation : जालन्यातील 200 ते 250 आंदोलकांवर गुन्हे दाखल, ट्रक जाळून चालकांसह क्लिनरला मारण्याचा प्रयत्न
September 02, 2023
0
Tags