<p>मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे, यासाठी सरकारनं ६० हजार कोटी खर्च करुन योजना आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ५० लाखांपर्यंतच्या घरांना ही योजना लागू असेल. कर्जाची जी रक्कम असेल, त्यातील ९ लाखांवर कर्ज अनुदान मिळणार आहे. हे अनुदान ३ ते साडे सहा टक्क्यांपर्यंत असेल. अनुदानाची रक्कम थेट कर्ज देणाऱ्या संस्थेकडे जमा केली जाईल. येत्या दोन महिन्यात ही योजना लागू केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. <br />शहरी भागातील कमी उत्पन्न गटातील, कर्जासाठी अर्ज करणाऱ्या २५ लाख अर्जदारांना या योजनेचा फायदा होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.</p> <p> </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/KQF0Obe
Home Loan : घर खरेदी करणाऱ्यांना लवकरच दिलासा? केंद्र सरकार गृहकर्जावर सबसिडी देण्याच्या तयारीत
September 25, 2023
0
Tags