Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पा मोरया....मंगलमूर्ती मोरया....अशा जयघोष आज सगळीकडे ऐकायला मिळत आहे. आज 19 सप्टेंबर... आज श्री गणेश चतुर्थी... (Ganesh Chaturthi) ज्या दिवसाची अनेकांनी आतुरतेने वाट पाहिली आणि तो दिवस अखेर उजाडला आहे. आबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज घरोघरी आगमन होत आहे. सार्वजनिक मंडळांपासून घराघरात आकर्षक देखाव्यात आणि मखरात गणराज आज विराजमान होतील. बाप्पाची आज विधिवत प्राणप्रतिष्ठा करुन दहा दिवसांच्या उत्साहपर्वाला (Ganesh Utsav 2023) प्रारंभ होईल. बाप्पाच्या आगमनाने घराघरात मंगलमय वातावरण आहे. पुढील दहा दिवस बाप्पाची सजावट, आरत्यांचे स्वर, गौराईचे आगमन, गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष ऐकायला मिळणार आहे.

गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त

ज्योतिषांच्या मते, पंचागानुसार, 19 सप्टेंबर हा दिवस गणेश स्थापनेसाठी अतिशय शुभ आहे. 19 सप्टेंबर रोजी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:01 ते दुपारी 01:28 पर्यंत आहे.

गणपती पूजनाचा मुहूर्त

असे मानले जाते की, श्रीगणेशाचा जन्म मध्यान्हकाळात झाला होता, म्हणून दुपारची वेळ गणेशपूजेसाठी अधिक शुभ मानली जाते. मध्य मुहूर्तामध्ये, भक्त पूर्ण विधींनी गणेशपूजा करतात, ज्याला षोडशोपचार गणपती पूजा असेही म्हणतात.

गणेशमूर्ती स्थापनेची पद्धत

सर्वप्रथम गंगाजल पदरावर शिंपडून घर शुद्ध करा.
यानंतर, चौरंगावर लाल रंगाचे कापड पसरवा आणि ते तसेच ठेवा.
श्री गणेशाची मूर्ती चौरंगावर बसवा.
आता गणपतीला स्नान करून गंगाजल शिंपडा.
रिद्धी-सिद्धीचे चिन्ह म्हणून मूर्तीच्या दोन्ही बाजूला एक एक सुपारी ठेवा.
गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला पाण्याने भरलेले भांडे ठेवा.
हातात अक्षता आणि फुले घेऊन गणपती बाप्पाचे ध्यान करा.
भगवान गणेशाच्या मंत्राचा जप करा: ऊँ गं गणपतये नमः.

from maharashtra https://ift.tt/3tszKo0
गणपती बाप्पा मोरया! विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आज दिमाखात आगमन, लालबागच्या राजाची पहाटे पाच वाजता प्राणप्रतिष्ठा
September 18, 2023
0
Tags