मुंबई : भारताने अंतराळ क्षेत्रात आजच्याच दिवशी इतिहास घडवला होता. मंगळावर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला. 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात भारताने आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या पोहचवले. महात्मा फुले यांनी सत्याशोधक समाजाची स्थापना केली. जगप्रसिद्ध असलेल्या होंडा मोटार्स या कंपनीची आजच्याच दिवशी स्थापना करण्यात आली. मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता.

1726 : ईस्ट इंडिया कंपनीला महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार दिला

ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 31 डिसेंबर 1600 या कंपनीची स्थापना करण्यात आली. पण अगदी थोड्याच दिवसात या कंपनीने संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. 1858 मध्ये कंपनीचे विलीनीकरण झाले. त्यानंतर भारतावर ब्रिटीश राजवट आली.24 सप्टेंबर 1726 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला.

1873: महात्मा फुलेंनी केली सत्यशोधक समाजाची स्थापना

24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्याशोधक समाजाची स्थापना केली. जमीनदार आणि पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून समाजाला मुक्त करण्याच्या हेतूने सत्याशोधक समाजाची स्थापना करण्यात आली. निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी हा विचार महात्मा फुलेंनी मांडला. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला . 'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात होते. सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली गेली. समाजातील विषमता नष्ट करुन तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

1932: पुणे करारावर स्वाक्षऱ्या

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झाला होता. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा या कराराचा मुख्य उद्देश होता. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींनी आजच्याच दिवशी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. प्रांतिक विधान सभेत साधारण निवडणूक क्षेत्रातील जागांपैकी दलित वर्गासाठी 148 राखीव जागा ठेवण्यात आल्या.

1861: भारतीय क्रांतिकारक मादाम कामा यांचा जन्म

मादाम भिकाईजी रुस्तम कामा अर्थातच मादामा कामा यांचा 24 सप्टेंबर 1861 रोजी मुंबईतील पारशी कुटुंबात जन्म झाला होता. त्यांचे वडिल प्रसिद्ध व्यापारी होते. मादाम कामा यांचे शिक्षण इंग्रजीतून झाले असल्याने त्यांचे इंग्रजीवर चांगले प्रभुत्व होते. दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्‍न करण्यास प्रवृत्त केले.जर्मनीत श्टुटगार्ट येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मादाम कामा यांच्यावर सोपवण्यात आली. तिथे कुणाच्याही विरोधाला न जुमानता त्यांनी भारताचा पहिला झेंडा फडकविला.

1889: केशराव त्र्यंबक दाते यांचा जन्म

मराठी रंगभूमीवर नट आणि नाट्यशिक्षक म्हणून ज्यांनी नाव कमावलं अशा केशराव त्र्यंबक दाते यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 24 सप्टेंबर 1889 मध्ये जन्म झाला. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांची सावली दूर गेली. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्यांनी पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर मुंबई गाठली. त्या काळात महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटकं पाहिल्यानं नट होण्याची जिज्ञासा त्यांच्यामध्ये जागृत झाली. एका हौशी नाट्यसंस्थेच्या झुंजारराव नाटकातील सारजेची भूमिका हीच केशवरावांची पहिली भूमिका होती. पुढे 20 मे 1907 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश मिळवला. प्रेमसंन्यास नाटकातील जयंत, सत्वपरीक्षा नाटकातील हरिश्चंद्र, पुण्यप्रभाव नाटकातील वृंदावन आणि विचित्रलीला नाटकातील विचित्र या त्यांच्या काही नावजलेल्या भूमिका

1990 : पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली

नाटोला विरोध म्हणून सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालील पूर्व युरोपीय देशांच्या युतीने 1955 मध्ये वॉर्सा करारावर स्वाक्षरी केली. सोव्हिएत युनियन, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरिया या देशांचा यामध्ये समावेश होता. नाटोमध्ये सामील असलेल्या देशांचा मुकाबला करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. परंतु, 24 सप्टेंबर 2004 रोजी पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली.

2014 : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पाऊल ठेवलं

मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम आहे. आंध्रप्रदेशातील सतीश धवन अवकाश केंद्रातून या यनाचे पीएसएलव्ही सी-25 या रॉकेटच्या साहाय्याने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. साधारणतः 25 दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले होते. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून मंगळाच्या दिशेने झेपावले. 24 सप्टेंबर 2014 रोजी अगदी पहिल्याच प्रयत्नात भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. तर मंगळावर जाणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या घटना :

1551: प्रचंड कवी दासो दिगंबर देशपांडे ऊर्फ दासोपंत यांचा जन्म.
1859 : धुंडू पंत उर्फ नाना साहेब यांचे निधन
1948: होंडा मोटार कंपनीची स्थापना.
1960: अणुशक्तीवर चालणाऱ्या यू. एस. एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
1995: मृत्यूंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तिदेवी पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक आहेत.
1950: क्रिकेटपटू आणि समालोचक मोहिंदर अमरनाथ यांचा जन्म.
2004 : वादळानंतर हैतीमध्ये आलेल्या पुरात किमान 1,070 लोकांचा मृत्यू झाला

from maharashtra https://ift.tt/e5i4TX8
24 September In History : फुलेंच्या सत्यशोधक समाजाची स्थापना, गांधी आणि आंबेडकरांमध्ये ऐतिहासिक पुणे करार; आज इतिहासात
September 23, 2023
0
Tags