Ads Area

23 September In History : भारतात बालविवाहाला बंदी, भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन, भारत-पाकिस्तान युद्ध विराम; आज इतिहासात...

23 September In History : प्रत्येक दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गाजलेली 'चले जाव'  या घोषणेचे जनक, स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी नेते युसूफ मेहरअली यांचा आज जन्मदिन आहे. भारतात पहिल्यांदाच कायद्याद्वारे बालविवाहाला बंदी घालण्यात आली. त्याशिवाय, 1965 भारत-पाकिस्तान युद्ध विराम जाहीर करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन - International Day of Sign Languages

मूक-बधिर व्यक्ती संवाद साधण्यासाठी विशिष्ट सांकेतिक खूणा वापरतात. हात, चेहरा आणि शरीराच्या हालचालींनी संवाद साधतात. ज्याप्रमाणे प्रत्येक भाषेचे स्वतःचे व्याकरण आणि नियम असतात, त्याचप्रमाणे सांकेतिक भाषेचा देखील स्वतःचा अभ्यासक्रम असतो, परंतु ही भाषा कधीही लिहिली जात नाही.

वर्ल्ड डेफ असोसिएशनने आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. संयुक्त राष्ट्रांच्या (UNO) आमसभेने 23 सप्टेंबर 2018 हा दिवस सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केला. 2018 मध्ये प्रथमच सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला.

जागरुकता आणि त्याचे महत्त्व निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन साजरा केला जातो. या दिवशी कर्णबधिरांसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून त्यांना या भाषेबद्दल नवनवीन गोष्टींची जाणीव करून दिली जाते. वर्ल्ड डेफ असोसिएशनच्या मते, जगात अंदाजे 72 दशलक्ष कर्णबधिर लोक आहेत, त्यापैकी 80 टक्के केवळ विकसनशील देशांमध्ये आहेत. भारतात मूक-बधिर व्यक्तींची संख्या जगभरात सर्वाधिक आहे.

1858 : मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन.

जेम्स ग्रॅंट डफ हा एक ब्रिटिश सैनिक आणि स्कॉटिशवंशीय इतिहासकार होता. ग्रॅंट डफ याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या स्थापनेपासून पेशवाईच्या अंतापर्यंत मराठ्यांचा इतिहास लिहिला. म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात.

1806 मध्ये ग्रॅंट डफ मुंबईत उतरला. त्याने मुंबईच्या लष्करात कॅडेट (सैन्य प्रशिक्षणार्थी) म्हणून प्रवेश मिळवला व एप्रिल 1807 मध्ये तो लष्कराच्या सेवेत दाखल झाला. 1808 मध्ये काठेवाडमधील लुटारुंच्या 'मालिया' किल्ल्यावर इंग्रज सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात ग्रॅंट डफने शौर्य दाखवले. 1810 मध्ये त्याची 'लेफ्टनंट' पदावर पदोन्नती झाली. त्याने फार्सी भाषा आत्मसात केली. त्यामुळे इंग्रज पलटणीचा (बटालियन) फार्सी दुभाषी म्हणून तो निवडला गेला.

1884 : भारतातील कामगार चळवळीचा प्रारंभ; बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन

महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.  मुंबईत कामगारांना न्याय मिळवून देणासाठी व त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी स्थापली गेलेली गिरणी कामगार संघटना होती. या संघटनेपासूनच भारतातील कामगार चळवळ सुरू झाली, असे म्हटले जाते. भारतातील कामगार चळवळीत नारायण मेघाजी लोखंडे यांचे मोठे योगदान आहे.

1903 :  'चले जाव' घोषणेचे जनक स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्मदिन

युसूफ मेहर अली हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी होते. मेहरअली यांच्या आजोबांचा मुंबईमध्ये कापडाचा व्यवसाय होता. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. कॉलेजमध्ये असताना ते बॉम्बे प्रेसीडेंसी युथ लिग संघटनेत सामील झाले. युसूफ मेहेर असली यांनी 1942 च्या चले जाव आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या आंदोलना चले जाव ही घोषणादेखील त्यांनी दिली होती.

1942 मध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू होती. त्यावेळी महात्मा गांधी यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत चर्चा केली. आंदोलनासाठी रणनीती आखण्यात येत होती त्याला साजेसं म्हणून 'क्विट इंडिया' ही घोषणा द्यावी असे यूसूफ मेहरअलींनी गांधींना सुचवले. गांधींनाही कल्पना प्रचंड आवडली. सायमन कमिशनच्या विरोधात देण्यात आलेली 'सायमन गो बॅक' ही घोषणा देखील त्यांनी दिली होती.

1908 : राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म

राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर 1908 रोजी झाला होता. रामधारी सिंह दिनकर हे राष्ट्रवादी कविता आणि साहित्य लेखनासाठी प्रसिद्ध होते. रामधारी दिनकर सिंह यांनी हिंदी साहित्यावर आपल्या लिखानातून मोठा प्रभाव पाडला.

1929 : भारतात पहिल्यांदा बालविवाहाला बंदी, शारदा विधेयक मंजूर

आजच्याच दिवशी, 23 सप्टेंबर 1929 रोजी भारतात बालविवाह विधेयक मंजूर करण्यात आलं. हरविलास शारदा यांनी हे विधेयक मांडलं गेलं होतं. त्यामुळे त्यांचेच नाव या विधेयकाला देण्यात आलं होतं. लग्नासाठी मुलींच्या विवाहाचे वय 18 आणि मुलांचे वय हे 21 असावं अशी तरतूद या कायद्यात करण्यात आली होती. हा कायदा केवळ हिंदूंच्या साठीच नव्हे तर ब्रिटिश भारतातील सर्व लोकांना लागू करण्यात आला होता. भारतात सुरू असलेल्या समाजसुधारणेचे हे मोठं यश मानलं गेलं.

1939- सिग्मंड फ्राईड (Sigmund Freud) यांचं निधन

जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्राईड यांचा आजच्या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर 1939 रोजी निधन झालं होतं. सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्रातील अनेक महत्त्वाचे आणि पायाभूत सिद्धांत मांडले. 20 व्या शतकातील सर्वात मोठे मानसशास्त्रज्ञ समजले जायचे.

1964 :  नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन

मामा वरेरकर ह्या नावाने विशेष प्रसिद्ध असलेले नाटककार भार्गवराम विठ्ठल वरेरकर यांचा जन्म. ‘जीवनासाठी कला’ही वरेरकरांची भूमिका होती. पुरोगामी नाटककार आणि कांदबरीकार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी एकूण 37 नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबऱ्या आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. 1908 मध्ये त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर 1918 मध्ये आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय. नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. 1920 ते 1950 या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते. त्यांच्या अनेक नाटकांचे भारतातील इतर प्रादेशिक भाषेतही अनुवाद झाला.

नाटककार आणि साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती.

1950 : समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म

सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा आज जन्मदिन.  सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यानी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे मॉडेल वापरतात.

डॉ. अभय बंग यांनी गडचिरोलीमध्ये दारूबंदी चळवळ चालवली होती. 1988 मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवऱ्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर 104 गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील तीन आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले.

रोजगार हमी योजनेतील किमान मजुरीचा दरामागाचा शास्त्रीय अभ्यास केल्यावर तो दर 4 रुपये नसून 12 रुपये आहे असा निष्कर्ष अभय बंगानी मांडला. आणि तो इतका मुद्देसूद होता की सरकारला तो मान्य करावा लागला.  'गांधीजी', 'लोक' आणि 'विज्ञान' ह्या अभय बंगांच्या तीन महत्त्वाच्या प्रेरणा आहेत. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभय बंगांवर प्रभाव आहे.

डॉ. अभय बंग यांना 2003 चा महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. त्याशिवाय, 2018 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1965 : भारत-पाकिस्तानमध्ये युद्धविराम

1965 मध्ये भारतावर हल्ला करून पाकिस्तानने आगळीक केली होती. त्याला भारतीय सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी सैन्याचे कंबरडे मोडले होते. सप्टेंबर 1965 मध्ये लाहोर जवळजवळ भारताच्या ताब्यात आले होते. पाकिस्तान हे शहर गमावण्याच्या उंबरठ्यावर आले होते. पण 23 सप्टेंबर 1965 रोजी संयुक्त राष्ट्र संघाने हस्तक्षेप केला आणि भारताने युद्धविराम घोषित केला. या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये ताश्कंद करार झाला.

इतर महत्त्वाच्या घटना :

1905 : आधी एकत्र असलेल्या नॉर्वे आणि स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
1919 : शिक्षणतज्ज्ञ, समाजवादी विचारवंत, संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक, पुणे विद्यापीठाचे दहावे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचा जन्म.
1932: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
2002: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
2009- ओशनसॅट 2 चे प्रक्षेपण; देशातील हवामानाचा अंदाज, हिंदी महासागरातील घडामोडी तसेच वातावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने उपग्रह प्रक्षेपित केले.
2020- जम्मू काश्मीरच्या अधिकृत भाषा विधेयक पारित

from maharashtra https://ift.tt/7aCBWLZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area