Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची (Swabhimani Shetkari Saghtana) पुण्यात (Pune) आज शिस्तपालन आणि कोअर कमिटीची बैठक आहे. या बैठकीला स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) जाणार नाहीत. अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून एबीपी माझाला ही माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

परवापासून रविकांत तुपकर नॉट रिचेबल

रविकांत तुपकर हे गेल्या काही महिन्यांपासून राजू शेट्टी यांच्या कार्यपाध्दतीवर नाराज आहेत. त्यांनी गेल्या काही काळात राजू शेट्टी यांच्यावर उघडपणे टीका देखील केलीय. त्यामुळं आता रविकांत तुपकर यांच्या मनात चाललंय तरी काय...? असा सवाल उपस्थित होतोय. मिळालेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. परवापासून नॉट रिचेबल असलेले रविकांत तुपकर लवकरच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्याची शक्यता

रविकांत तुपकर यांनी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यामुळेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याकडून रविकांत तुपकर यांचे नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. याला खुद्द रविकांत तुपकर यांनी दुजोरा दिला आहे. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत असल्याचे तुपकर म्हणालेत. त्यामुळं आता तुपकर स्वाभिमानीत राहणार की वेगळा पर्याय निवडणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.

तुपकरांनी भाजपमध्ये यावं, आशिष देशमुखांनी दिली ऑफर

भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी रविकांत तुपकर यांनी भाजपमध्ये यावं असं म्हटलं होतं. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी झटणारे नेते म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. शेतकरी हितासाठी भाजप कमालीची कामं करणारा पक्ष आहे. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा असं देशमुखांनी म्हटलंय. रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यमान नेतृत्वार थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत बहुजन समाजाचा स्वाभिमान दुखावला जात असल्याची शेतकऱ्यांची भावना असल्याचे आशिष देशमुख म्हणाले. त्यामुळं तुपकरांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी ऑफर देशमुख यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/7ArPh58 Tupkar : भाजपच्या कोणत्याही नेत्याचा मला फोन नाही, आशिष देशमुखांच्या वक्तव्यानंतर रविकांत तुपकरांचं प्रत्युत्तर

from maharashtra https://ift.tt/kbj6B9w
Ravikant Tupkar : रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार? सुत्रांची माहिती; आजच्या पुण्यातील बैठकीलाही जाणार नाहीत
August 07, 2023
0
Tags