Eknath Khadse : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या आदेशाला देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) स्थगिती म्हणजे एक प्रकारे अजितदादांची मानहानी करण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली. अजित पवार यांच्या अधिकारावर मर्यादा आल्यासारखे आहे. वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी जे अधिकार घेतले त्यावर आता फडणीसांचे नियंत्रण राहील. त्यामुळं आता प्रत्येक फाईल ही फडणवीसांकडे जाईल त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे जाईल असा टोलाही खडसेंनी लगावला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस हे सीनियर उपमुख्यमंत्री आहेत. आता अजितदादा यांच्यासारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी सीनियर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही लागेल, अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांना डीवचले. मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच असल्याचे खडसे म्हणाले. साऱ्याच मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांमध्ये आपसात मतभेद दिसत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. मंत्री गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर डोळा होता, मात्र ते मिळणारच नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा नाद सोडला असेही एकनाथ खडसे म्हणाले.

केंद्र सरकारही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठले

कांदा उत्पादकांच्या मागण्यांबाबत कुठलाही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. कांदा उत्पादकांच्या आंदोलनात शेतकऱ्यांशी राज्याचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा केली. मागण्या सोडवण्याचा आश्वासन दिलं. मात्र, अद्यापही कांदा उत्पादकांच्या या मागण्यांबाबत योग्य तो निर्णय झालेला नाही. राज्य सरकार कांदा उत्पादकांची गळचेपी करत आहेत. तर केंद्र सरकारही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असल्याचे खडसे म्हणाले. संकट मोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांचा कांदा उत्पादकांचे संकट निवारणासाठी काही उपयोग झालेला नाही असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. .

इंडिया आघाडीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष

इंडिया आघाडीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं आहे. कारण या बैठकीमध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीचे निर्णय होतील त्या माध्यमातून राजकारणाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न राहील. केंद्र सरकार विरोधात जनतेत जी नाराजी आहे ती एकत्र होवून इंडियाला पाठबळ मिळेल असे खडसे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/kxJYLic News : 'अकेला ही एकनाथ खडसे भारी था', उभं राहून कामं केली, तीन तीन मंत्री असूनही... एकनाथ खडसेंची टीका

from maharashtra https://ift.tt/6DbrIgM
Eknath Khadse : देवेंद्र फडणवीसांकडून अजित पवारांची मानहानी करण्याचा प्रयत्न, एकनाथ खडसेंची टीका
August 30, 2023
0
Tags