पुणे : अजित पवार गटाचे (Ajit Pawar) नेते आणि शरद पवारांचे (Sharad Pawar) अनेक वर्षं सहकारी राहिलेले दिलीप वळसे पाटील यांनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे. जनतेन एकदाही बहुमत देऊन पवारांना मुख्यमंत्री केलं नाही असं वळसे पाटील (Dilip Walse Patil) रविवारी एका कार्यक्रमात म्हणाले. या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात बरीच खळबळ माजली आहे. कारण वळसे पाटील आता जरी अजित पवारांसोबत असले तरी ते पवारांचे अतिशय विश्वासू मानले जायचे. पवारांचे एकेकाळचे स्वीय्य सहाय्यक ते राज्याचे गृहमंत्री हा त्यांचा प्रवास अनेकदा चर्चेचा विषय देखील असतो. असं असताना पवारांवर इतकी बोचरी टीका वळसेंनी का केली असावी, याची चर्चा आता रांगू लागली आहे

दिलीप वळसे पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशामध्ये नाही असं आपण म्हणतो परंतु महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. शरद पवारांसारखे नेते असताना फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात.

ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या

देशातील अनेक राज्यातील प्रादेशिक पक्ष पाहिले तर ते पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या. आपल्याकडं शरद पवारांसारखे नेते आहेत. मात्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आपले फक्त 60 ते 70 आमदार निवडून येतात. नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते असे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

...तर आमदारकीचा राजीनामा देईल

ईडीवरून होत असलेल्या टीकेला वळसे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणाला नोटीस सापडली तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे चॅलेंज देखील त्यांनी या वेळी दिले. राज्य सरकारमध्ये मी, अजित पवार व काही सहकारी सहभागी झालो. याचा अर्थ भारतीय जनता पक्षात गेलो असे अजिबात नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरच आहोत. ईडी, सीबीआय इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यामुळे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले असा अपप्रचार केला जात आहे. ते चुकीचे आहे. तशी नोटीस कोणाला सापडली तर घेऊन या तर आमदारकीचा लगेच राजीनामा देईल, असे देखील दिलीप वळसे पाटील म्हणाले.

हे ही वाचा :

<a class="topic_text" title="Sharad Pawar : राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर, यांना जनताच खरी जागा दाखवेल; शरद पवारांचा सरकारवर घणाघात" href="https://ift.tt/2Z9Hx8l Pawar : राज्यकर्त्यांकडून सत्तेचा गैरवापर, यांना जनताच खरी जागा दाखवेल; शरद पवारांचा सरकारवर घणाघात

from maharashtra https://ift.tt/gGBc7wn
Dilip Walse Patil: जनतेन एकदाही बहुमत देऊन शरद पवारांना मुख्यमंत्री केलं नाही, दिलीप वळसे पाटलांचा हल्लाबोल
August 20, 2023
0
Tags