Ads Area

BMC Covid Scam Case : महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांना आर्थिक गुन्हे शाखेनं बजावले समन्स, आज होणार चौकशी

Mumbai BMC Covid Scam Case :  कोरोना काळात बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार (Ramakant Biradar) यांना आर्थिक गुन्हे शाखेनं (Economic Offences Wing ) समन्स बजावले आहे. कोविड काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी बिरादार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी आता  मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर माकांत बिरादार हे जबाब नोंदवणार आहेत.

घोटाळ्याच्या वेळी रमाकांत बिरादार हे मुंबई महापालिकेच्या खरेदी विभागात उपमहापालिका आयुक्त म्हणून कार्यरत होते. कोविड काळात झालेल्या बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आता याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. सध्या बिरादार हे उपमहापालिका आयुक्त झोन 2 आहेत. कोविड काळात ते केंद्रीय खरेदी विभागाचे प्रभारी होते.  यापूर्वी ईडीने रमाकांत बिरादार यांचे जबाब नोंदवले आहे. दरम्यान, याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त पी वेलरासू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यासह वेदान्त इनोटेक प्रा. लि, तत्कालीन अतिरिक्त पालिका आयुक्त, मध्यवर्ती खरेदी विभागाचे (सीपीडी) तत्कालीन उपायुक्त व अनोळखी सरकारी कर्मचारी यांच्याविरोधात भादंवि कलम 409, 418, 420 व 120 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार 49 लाख 63 हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन पडवाले हे याप्रकरणातील तक्रारदार आहेत. मृतदेहासाठी पिशव्या, मुखपट्टीसह इतर साहित्याच्या खरेदीप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी ही चौकशी होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/2IVxA7P Pednekar : कोरोनाकाळातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण, किशोरी पेडणेकर यांना न्यायालयाचा दिलासा कायम

from maharashtra https://ift.tt/D6ydVs9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area