Ads Area
29th August In History: हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म, अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन; आज इतिहासात
29th August In History: देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 29 ऑगस्ट या तारखेला अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. भारताच्या संदर्भात पाहिले तर या तारखेला तीन महान व्यक्तींचा जन्म झाला. 1905 मध्ये आजच्या दिवशी भारताला देश आणि जगात नावलौकिक मिळवून देणारे महान हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्म आजच्याच दिवसाचा. त्यांच्याशिवाय, 1949 मध्ये भारतातील सर्वोच्च शास्त्रज्ञ के. राधाकृष्णन यांचा जन्म झाला. त्यांनीच मंगळ मोहिमेचे नेतृत्व केले आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मंगळाच्या कक्षेत पाठवण्यात भारताला यश मिळाले. या तारखेला 1969 मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेल्या मेजर मनोज तलवार यांचा जन्म झाला.
1612: भारताच्या वसाहती काळातील एक महत्त्वाची घटना घडली. सुरतच्या लढाईत पोर्तुगीजांना इंग्रजांच्या हातून पराभव पत्करावा लागला.
1842: ब्रिटन आणि चीन यांच्यातील नानकिंगच्या करारावर स्वाक्षरी करून पहिले अफू युद्ध संपले.
1887: गांधीजींचे एकेकाळचे डॉक्टर आणि गुजरातचे पहिले मुख्यमंत्री जीवराज मेहता यांचा जन्म.
1905 : भारताचे प्रसिद्ध हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म
भारतीय हॉकीला सुवर्णकाळ देणारे खेळाडू म्हणून मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांची ओळख आहे. मेजर ध्यानचंद अर्थात ध्यानचंद सिंग यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हॉकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. त्यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे.
मेजर ध्यानचंद यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. ध्यानचंद यांच्या खेळातील या योगदानामुळे त्यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय खेळ दिन म्हणून ओळखला जातो.
1931: शक्तिशाली नागा चळवळीचा पाया रचणारे नागा आध्यात्मिक गुरु जडोनांग यांचे निधन.
1932: नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅम येथे आंतरराष्ट्रीय युद्धविरोधी समितीची स्थापना.
1945: ब्रिटिशांनी हाँगकाँगला जपानपासून मुक्त केले.
1949: भारतातील एक अव्वल शास्त्रज्ञ के. राधाकृष्णन यांचा जन्म. त्यांच्या नेतृत्वाखालीच भारताने मंगळयान पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत नेले.
1957: नागरी हक्क कायदा, 1957 पारित करण्यात आला.
1969: कारगिल युद्धात शहीद झालेले मेजर मनोज तलवार यांचा जन्म.
1974: चौधरी चरणसिंग यांनी लोकदल पक्षाची स्थापना केली.
1976: प्रसिद्ध बंगाली विद्रोही कवी, संगीतकार आणि तत्त्वज्ञ काझी नजरुल इस्लाम यांचे निधन.
1980: स्वातंत्र्य सेनानी आणि माधव श्रीहरी अणे यांचा जन्म. देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी राज्यपाल म्हणून काम केलं.
1996: आर्क्टिक बेटाच्या स्पिट्सबर्गन पर्वतावर विमान कोसळले. वनुकोवो एअरलाइन्सच्या अपघातात विमानातील सर्व 141 लोकांचा मृत्यू झाला.
2007: हरियाणाचे चौथे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक बनारसी दास गुप्ता यांचे निधन.
2008 : अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन
जयश्री गडकरांचा (Jayshree Gadkar) जन्म कर्नाटकातील कणसगिरी, कारवार जिल्ह्यात झाला. 1956 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी 'दिसतं तसं नसतं' या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका आणि साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे ऑगस्ट 29, 2008 रोजी मुंबईत हृदयविकाराने निधन झाले.
2008: बंगालच्या सिंगूरमधून टाटांनी आपला प्रकल्प मागे घेतला
बंगालच्या औद्योगिक इतिहासातील महत्त्वाची घटना आजच्या दिवशी घडली आहे. टाटा मोटर्सने सिंगूरमध्ये नॅनो प्रकल्प सुरू केला, त्याला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. विरोधामुळे संतप्त झालेल्या टाटांनी आपला प्रकल्प मागे घेत असल्याची घोषणा केली.
2014: गांधी चित्रपटासाठी ऑस्कर विजेते दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो यांचे निधन.
from maharashtra https://ift.tt/hTuVatD
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area