Ads Area

14th August Headlines : म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी सोडत, राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार बारामतीमध्ये...आज दिवसभरात...

14th August Headlines : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशाला उद्देशून भाषण करतील. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर जवळपास दीड महिन्यानंतर शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. तर, दुसरीकडे आज म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत काढली जाणार आहे.

म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी आज सोडत

मुंबई- म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या 4082 सदनिकांच्या विक्रीसाठी आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत.

राष्ट्रवादीच्या बंडानंतर शरद पवार बारामतीमध्ये दाखल

बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बारामती मुक्कामी आहेत. राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर दीड महिन्यांच्या कालावधीनंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामतीत आले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत भाजपचे काही नेते आणि माजी आमदार राष्ट्रवादीत सकाळी प्रवेश करण्याची शक्यता आहे.

मनसेची मुंबईत बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक होणार आहे. राज ठाकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. मुंबईच्या एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे.

भारत-चीनमध्ये कमांडर पातळीवर बैठक

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावर आज 19 वी कमांडर स्तरिय बैठक असेल. वाद असलेल्या सीमेच्या ठिकाणावरुन सैनिकांना त्वरित मागे हटवा यावर भारताचा जोर असेल.

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे देशाला उद्देशून भाषण

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला संबोधित करतील. सायंकाळी सात वाजता त्या देशाला संबोधतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अखंड भारत संकल्पना दिन

अखंड भारत ही संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकीकरण होणे अपेक्षित आहे. प्राचीन कालापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्ये, संस्थाने, साम्राज्ये यात विभागला गेला आहे, याचे एकत्रीकरण कमी वेळा झाले.अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. 14 ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून संघात साजरा केला जातो.

नागपूर - अखंड भारत दिनाच्या निमित्ताने राष्ट्र निर्माण समितीद्वारे आज नागपुरातील सक्करदरा चौकावर शालेय विद्यार्थ्यांचा सामूहिक वंदेमातरम गीत गायन आयोजित करण्यात आले आहे.  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तसेच लडाखचे खासदार हे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

पुणे - भाजपकडून फाळणीचा निषेध म्हणून कसबा मतदारसंघातील हेमंत रासने यांच्याकडून निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

अहमदनगर -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने 'मशाल यात्रा' काढून अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जाणार आहे.

गोंदिया - विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गोंदियाच्या वतीने आज भारत संकल्प दिवस साजरा करण्यात येणार आहे.

from maharashtra https://ift.tt/dnPb6jF

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area