Mumbai Rain Live Updates : सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर कुठं पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज (गुरुवार दिनांक 27 जुलै 2023) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज अति मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी

मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्या तआली आहे.

from maharashtra https://ift.tt/prl135O
Mumbai Rain Live Updates : मुंबईत पावसाचा जोर वाढला, आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी
July 26, 2023
0
Tags